औरंगाबादच्या माजी महापौरांना कोरोनाची लागण, रुग्णालयात उपचार

औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण झाली आहे. (Aurangabad Mayor Nandkumar Ghodele tested Corona Positive)

औरंगाबादच्या माजी महापौरांना कोरोनाची लागण, रुग्णालयात उपचार
| Updated on: Sep 22, 2020 | 3:33 PM

औरंगाबाद : औरंगाबादचे माजी महापौर नंदकुमार घोडेले यांना कोरोनाची लागण झाली आहे. त्यांच्यावर औरंगाबादेतील सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत. सध्या त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती मिळत आहे. (Aurangabad Mayor Nandkumar Ghodele tested Corona Positive)

नंदकुमार घोडेले यांना गेल्या काही दिवसांपासून कोरोनाची लक्षण जाणवत होती. म्हणून त्यांनी कोरोनाची चाचणी केली होती. या चाचणीचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला आहे. त्यानंतर त्यांच्यावर औरंगाबादच्या सिग्मा रुग्णालयात उपचार सुरु आहेत.

औरंगाबादेत कोरोनाचा प्रादुर्भाव झाल्यापासूनच नंदकुमार घोडेले हे अनेक उपाययोजना करत होते. त्यांनी कोरोनाची साथ नियंत्रणात आणण्यासाठी अनेक प्रयत्न करत होते. दरम्यान गेल्या काही दिवसांपासून विविध बैठकांनाही त्यांनी हजेरी लावली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात आलेल्यांनी कोरोनाची चाचणी करावी, असे आवाहन केले आहे.

मुंबईच्या महापौर कोरोनामुक्त

दरम्यान काही दिवसांपूर्वी मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांना 10 सप्टेंबरला कोरोनाची लागण झाली होती. त्यांच्यावर सेव्हन हिल रुग्णालयात उपचार सुरु होते. दहा दिवसांनी त्यांचा कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. त्यामुळे त्यांना रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आला होतो. त्यांना पुढील 14 दिवस होम क्वारंटाईन राहावे लागणार आहे.

किशोरी पेडणेकर या लॉकडाऊनपासून अनेक उपाययोजना करताना दिसत आहेत. स्वत: रस्त्यावर उतरुन त्या कोरोना स्थितीचा आढावा घेत आहेत. अनेक रुग्णालयांमध्ये प्रत्यक्ष भेटी, कोव्हिड सेंटरमध्ये जाऊन पाहणी, गणवेश परिधान करुन नर्सना प्रोत्साहन, अशा विविध रुपात किशोरी पेडणेकर पाहायला मिळाल्या.

यापूर्वीही किशोरी पेडणेकर यांची कोरोना चाचणी करण्यात आली होती. मात्र त्यावेळी त्यांचा रिपोर्ट निगेटिव्ह आला होता. किशोरी पेडणेकर या ग्राऊंडवर असल्याने, त्यांचा लोकांशी संपर्क येत असतो. इतके दिवस कोरोनाचा मुकाबला केल्यानंतर, आज त्यांचा अहवाल पॉझिटिव्ह आला होता.(Aurangabad Mayor Nandkumar Ghodele tested Corona Positive)

संबंधित बातम्या : 

मुंबईच्या महापौर झाल्या कोविड योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत

Kishori Pednekar | मुंबई महापौरांची कोरोनावर मात, लवकरच डिस्चार्ज