मुंबईच्या महापौर झाल्या कोविड योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत

महापौर किशोरी पेडणेकर यांनी याआधी नर्स म्हणून काम केलं आहे. मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी त्यांनी संवाद साधला. (Mumbai Mayor Kishori Pednekar Dressed as Nurse in Nair Hospital)

मुंबईच्या महापौर झाल्या कोविड योद्धा, किशोरी पेडणेकर पुन्हा नर्सच्या भूमिकेत
Follow us
| Updated on: Apr 27, 2020 | 2:55 PM

मुंबई : ‘कोरोना’चा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन मुंबईच्या महापौर किशोरी पेडणेकर यांनी परिचारिकांशी संवाद साधला. किशोरी पेडणेकर यांनी नायर रुग्णालयात परिचारिकेच्या वेषात जाऊन तिथे काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांचा हुरुप वाढवला. महापौरांनी फेसबुक पेजवर फोटो शेअर करत याविषयी माहिती दिली. (Mumbai Mayor Kishori Pednekar Dressed as Nurse in Nair Hospital)

महापौर किशोरी पेडणेकर यांनी याआधी नर्स म्हणून काम केलं आहे. मुंबईतील महापालिका रुग्णालयातील परिचारिकांशी आज त्यांनी संवाद साधला. ‘कोरोना’च्या पार्श्वभूमीवर किशोरी पेडणेकर यांनी पालिकेच्या नर्सना प्रोत्साहन दिलं.
‘मुंबईकरांसाठी काहीपण, आम्ही घरातून काम करु शकत नाही, आम्ही तुमच्यासाठी मैदानात उतरलो आहोत, तुम्ही आपापल्या घरी रहा व काळजी घ्या’ असं आवाहन किशोरी पेडणेकर यांनी फेसबुक पोस्टमधून जनतेला केलं आहे.

मुंबईतील 53 पत्रकारांना ‘कोरोना’ची लागण झाल्याचं गेल्या आठवड्यात समोर आलं होतं. यापैकी काही पत्रकारांच्या संपर्कात आल्यामुळे किशोरी पडणेकर यांनी स्वत:हून 14 दिवस होम क्वारंटाईनमध्ये राहण्याचा निर्णय घेतला होता. या काळात त्या व्हिडीओ कॉन्फरन्सिंग आणि व्हॉट्सअॅपद्वारे घरुनच महापालिकेची सर्व कामे करत होत्या. आता, आठवड्याभराच्या आतच त्या नायर हॉस्पिटलमध्ये नर्सशी संवाद साधण्यास गेल्या.

(Mumbai Mayor Kishori Pednekar Dressed as Nurse in Nair Hospital)

विरोधकांना परखड उत्तर देणाऱ्या नेत्या अशी किशोरी पेडणेकर यांची ओळख आहे. वरळीला शिवसेनेचा गड बनवण्यात किशोरी पेडणेकर यांचा मोठा वाटा आहे. शिवसेनेच्या ‘प्रथम ती’ या महिला सबलीकरणाच्या उपक्रमात त्यांनी सहभाग नोंदवला होता.

किशोरी पेडणेकर यांचा परिचय : 

  • किशोरी पेडणेकर या मुंबई महापालिकेच्या (191 G/S) वरळीतील गांधीनगर-डाऊन मिलमधील नगरसेविका आहेत.
  • किशोरी पेडणेकर यांचे दहावीपर्यंत शिक्षण वरळीतील बाबासाहेब आंबेडकर हायस्कूलमध्ये झाले आहे.
  • किशोरी पेडणेकर या सलग तीन वेळा नगरसेविका म्हणून निवडून आल्या आहेत.
  • महापौरपदाची धुरा सांभाळण्याआधी त्यांनी एकही मोठे पद भूषवलेले नव्हते.
  • काही काळासाठी त्या स्थापत्य शहर समितीच्या अध्यक्षा होत्या.
  • पेडणेकर यांना पालिका कामकाजाचा दांडगा अनुभव आहे.
  • किशोरी पेडणेकर यांना 2017-18 वर्षीचा प्रजा फाऊंडेशनतर्फे सर्वोत्कृष्ट नगसेवक म्हणून पुरस्कारही मिळाला आहे.

(Mumbai Mayor Kishori Pednekar Dressed as Nurse in Nair Hospital)

Non Stop LIVE Update
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका
त्यांच्या सुरक्षेत रणगाडे...पार्थ पवारांच्या सुरक्षेवरून ठाकरेंची टीका.
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर
निवडणुकीत 'जय श्रीराम' घोषणाबाजीचा फायदा होणार? राणांनी दिलं थेट उत्तर.
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका
भारताचं संविधान बदलणार? 'भाजप पुन्हा सत्तेत आल्यास...', ठाकरेंची टीका.
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?
बच्चू कडू पब्लिसिटी स्टंट करणारा..., रवी राणांचा हल्लाबोल काय?.
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका
'केसरकरांच्या कुंडलित राहू बसलाय, त्यासाठी यज्ञ घाला',कुणाची खोचक टीका.
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका
'उद्धव ठाकरेंचं संतुलन बिघडलंय...', एकनाथ शिंदे यांची खोचक टीका.