हायवाखाली ऑटो आला अन् अक्षरश: चुराडा झाला! गंगाखेडमध्ये भीषण अपघात, चार जण जागीच ठार

चुकार पिंपरी येथून विवाह सोहळा संपवून गंगाखेड-परळी रस्त्याने अंबाजोगाईकडे निघालेल्या ऑटोची आणि हायवा ट्रकची धडक झाली.

हायवाखाली ऑटो आला अन् अक्षरश: चुराडा झाला! गंगाखेडमध्ये भीषण अपघात, चार जण जागीच ठार
| Updated on: Dec 13, 2020 | 11:38 PM

परभणी : येथील सोनपेठ तालुक्यातील चुकार पिंपरी येथील विवाह सोहळा आटोपून गंगाखेड-परळी रस्त्याने परत परळीमार्गे अंबाजोगाईकडे निघालेल्या ऑटोरिक्षाला गंगाखेड येथे हायवा ट्रकने समोरुन धडक दिली. या अपघातात ऑटोचा चुराडा झाला आहे. तसेच या अपघातात अंबाजोगाई येथील चार तरुण जागीच ठार झाले आहेत.

चुकार पिंपरी येथून विवाह सोहळा संपवून गंगाखेड-परळी रस्त्याने परत परळीमार्गे अंबाजोगाईकडे निघालेल्या ऑटोची आणि हायवा ट्रकची धडक झाली. या अपघातात. विशाल बागवाले (20), दत्ता भागवत सोळंके (25), आकाश चौधरी (23), ऑटो चालक मुकुंद मस्के (22) या चार जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. हे चारही तरुण मुळचे अंबाजोगाई येथील रहिवासी आहेत.

इतर बातम्या

छेडछाडीला कंटाळून पंढरपुरात अल्पवयीन मुलीची आत्महत्या

महाराष्ट्र हादरला! विवाहित महिलेवर सामूहिक बलात्कार, अल्पवयीन मुलासह दोघांवर गुन्हा दाखल

प्रेमाला विरोध करणाऱ्या आजीसह नातवाची निर्घृण हत्या, मग रेल्वेखाली उडी घेत आत्महत्या, नागपुरात खळबळ