PHOTO | दंगल गर्ल बबिता फोगट आई होणार, इन्स्टाग्रामवर दिली गुड न्यूज
भारताची स्टार कुस्तीपटू बबीता फोगट लवकरच आई होणार आहे (Babita Phogat shares a picture flaunting her baby bump).
"तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला जाणीव करुन देतो की, मी खूप भाग्यवान आहे. तुझ्या सहवासात मी नेहमी आनंदी राहते. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यासाठी मी खूप उत्सुक आहे", असं बबिता इन्स्टाग्रामवर विवेकसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली.
Chetan Patil |
Updated on: Nov 23, 2020 | 11:30 PM
भारताची स्टार कुस्तीपटू बबिता फोगट लवकरच आई होणार आहे. बबिताने पती विवेक सुहागसोबत इन्स्टाग्रामवर फोटो शेअर करत आपल्या चाहत्यांना आनंदाची बातमी दिली आहे
बबिताने गेल्यावर्षी 2 डिसेंबर रोजी कुस्तीपटू विवेक सुहाग याच्याशी लग्न केलं होतं. लग्नाआधी ते पाच वर्षांपासून एकमेकांच्या प्रेमात होते.
“तुझ्यासोबत घालवलेला प्रत्येक क्षण मला जाणीव करुन देतो की, मी खूप भाग्यवान आहे. तुझ्या सहवासात मी नेहमी आनंदी राहते. आयुष्याच्या पुढच्या टप्प्यासाठी मी खूप उत्सुक आहे”, असं बबिता इन्स्टाग्रामवर विवेकसोबतचा फोटो शेअर करत म्हणाली.
बजरंग पूनिया पासून अन्य खेळाडूंनी बबिता आणि विवेक यांना अभिनंदन केलं आहे. त्याचबरोबर अभिनेत्री युविका चौधरी, अनिता हसनंदानी आणि उर्वशी ढोलकिया यांनी देखील शुभेच्छा दिल्या आहेत.
बबिता आणि विवेक यांनी स्टार प्लस वाहिनीच्या ‘नच बलिये’ कार्यक्रमातही भाग घेतला होता. या कार्यक्रमात दोघांनी आपली प्रेमकथा सांगितली होती.