AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Babri Demolition : बाबरी विध्वंस प्रकरणातील ‘हे’ प्रमुख चेहरे आज विस्मृतीत!

तब्बल 29 वर्षांपूर्वी आजच्या दिवशी (6 डिसेंबर) अयोध्येतील बाबरी मशीद पाडण्यात आली होती. त्याच्या निषेधार्थ अनेक संघटनांकडून हा दिवस काळा दिवस म्हणून साजरा करण्यात येतो.

Babri Demolition : बाबरी विध्वंस प्रकरणातील 'हे' प्रमुख चेहरे आज विस्मृतीत!
| Updated on: Dec 06, 2020 | 9:13 AM
Share

मुंबई : अयोध्येत 6 डिसेंबर 1992 रोजी बाबरी मशीदीची वादग्रस्त इमारत उद्ध्वस्त (Babri Masjid Demolition) करण्यात आली. या प्रकरणात माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani), मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi), उमा भारती (Uma Bharti) यांच्यासह भाजपच्या अनेक बड्या नेत्यांची नावं पुढं आली होती. मशीद पाडली त्या काळात आणि त्यापूर्वीच्या आंदोलनांदरम्यान देशभर या नेत्यांची मोठी चर्चा होती. बाबरी विध्वंस प्रकरणामुळे या नेत्यांना देश-विदेशात वेगळी ओळख मिळाली होती. परंतु आज जेव्हा अयोध्येत राम मंदिराचे बांधकाम सुरू झाले आहे, तेव्हा या नेत्यांचं राजकीय वजन पूर्वीसारखं राहिलेलं दिसत नाही. भाजपच्या राजकारणामुळे हे नेते विस्मृतीत गेल्याचं पाहायला मिळत आहे. भारतीय जनता पक्षातील त्यांचे वर्चस्व उरलेले नाही. (Babri Masjid Demolition : LK Advani, MM joshi, kalyan singh and Uma Bharti)

बाबरी विध्वंस प्रकरणातील प्रमुख आरोपींमध्ये माजी उपपंतप्रधान लालकृष्ण अडवाणी (Lal Krishna Advani), माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी (Murli Manohar Joshi), माजी मुख्यमंत्री कल्याण सिंह (Kalyan Singh) आणि माजी केंद्रीय मंत्री उमा भारती (Uma Bharti) यांच्यासह विनय कटियार (Vinay Katiyar) या नेत्यांची नावं होती. यावर्षी सप्टेंबर महिन्यात कोर्टाने या सर्वांची निर्दोष मुक्तता केली. आता हे सर्व नेते भाजपच्या राजकारणापासून खूप लांब आहेत. राम मंदिरावरुन देशभर राजकारण सुरु होतं तेव्हा ही नावं सर्वात पुढे होती. या राजकारणानंतर आणि अनेक वर्षांच्या न्यायालयीन लढाईनंतर आता अखेर राम मंदिराच्या कामाला सुरुवात झाली आहे, परंतु हे नेते कुठेही दिसत नाहीत, अथवा राम मंदिराच्या कामाचे त्यांना कोणतेही श्रेय मिळालेलं नाही. भाजपचे हे बडे नेते त्यांच्याच राजकारणामुळे विस्मृतीत गेले आहेत.

लालकृष्ण अडवाणी : राम मंदिर आंदोलनाचा सर्वात मोठा चेहरा असलेले लालकृष्ण अडवाणी आता भाजपच्या सक्रिय राजकारणात दिसत नाहीत. त्यांना भाजपने मार्गदर्शक मंडळामध्ये स्थान दिले आहे आणि त्यांना या मंडळाचे प्रमुख मानले जाते. मंदिराच्या उभारणीमागे त्यांचं योगदानही मोठं आहे. अडवाणी यांनी 1990 मध्ये भाजप अध्यक्ष असताना गुजरातमधील सोमनाथ येथून रथयात्रा सुरू केली होती. त्यांच्या या रथयात्रेला देशभरात अफाट लोकप्रियता मिळाली. राम मंदिरासाठी लोकांचं समर्थन मिळवण्यासाठी त्यांनी ही रथयात्रा देशभर काढली. देशभऱ सर्वत्र त्यांचं मोठं स्वागत झालं, रथयात्रेला लोकांचं मोठं समर्थनही मिळालं. त्यामुळे राम मंदिर बांधण्याची मागणी अधिक बळकट झाली. 1992 मध्ये बाबरी मशीद पाडण्यात आली आणि 9 नोव्हेंबर 2019 रोजी सुप्रीम कोर्टाने हिंदूंच्या बाजूने निकाल देऊन मंदिर बांधणीचा मार्ग मोकळा केला. आता मंदिराचे बांधकामही सुरू झाले आहे पण अडवाणींची चर्चा क्वचितच कधीतरी कानावर पडते.

मुरली मनोहर जोशी : राम मंदिर आंदोलनात माजी केंद्रीय मंत्री मुरली मनोहर जोशी हे अडवाणींचे सहकारी होते. जोशी यांनी अडवाणींच्या खांद्याला खांदा लावून देशभर आंदोलनं केली. 1991 मध्ये भाजपचे अध्यक्ष बनलेल्या जोशी यांनीदेखील राम मंदिरासाठी जोरदार मागणी केली. राम मंदिराच्या चळवळीत अडवाणींप्रमाणेच त्यांचीही प्रमुख भूमिका होती. बाबरी विध्वंसात त्यांच्यावर आरोप होते की, ते 6 डिसेंबरला आरएसएसच्या इतर नेत्यांसमवेत मंचावर उपस्थित होते. त्यांच्यावर बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात गुन्हेगारी कट रचल्याचा आरोप करण्यात आला होता. त्यातून त्यांची निर्दोष मुक्तता करण्यात आली, परंतु यामुळे ते भाजपच्या राजकारणात परत येऊ शकले नाहीत. त्यांचादेखील भाजपच्या मार्गदर्शक मंडळामध्ये समावेश करण्यात आला आहे.

कल्याण सिंह : हजारो कारसेवकांनी जेव्हा बाबरी मशिदीची इमारत पाडली तेव्हा कल्याण सिंह उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री होते. मात्र, मशीद पाडल्यानंतर परिस्थितीवर नियंत्रण ठेवण्यात अपयशी ठरल्याने त्यांनी 6 डिसेंबर रोजी संध्याकाळी या पदाचा राजीनामा दिला. सिंह यांनी 6 डिसेंबरच्या मेळाव्यापूर्वी सर्वोच्च न्यायालयात प्रतिज्ञापत्रात सादर केले होते, त्यात असे म्हटले होते की मशीदीचे कोणत्याही प्रकारचे नुकसान होणार नाही याची खबरदारी आम्ही घेऊ, आमचं सरकार मशिदीची पूर्ण काळजी घेईल. तथापि, तसे होऊ शकले नाही. असे म्हटले जाते की, बाबरी विध्वंस प्रकरणात कल्याणसिंह यांची पडद्यामागे मोठी भूमिका होती आणि सर्व काही त्यांच्या संमतीने घडत होते. कोर्टाने त्यांची निर्दोष मुक्तता केली आहे, परंतु या प्रकरणामुळे ते भाजपच्या सक्रीय राजकारणापासून दूर फेकले गेले. भाजपच्या या ‘हिंदूहृदय सम्राटा’ने यूपीमध्ये पक्षाला मोठी ओळख मिळवून दिली आणि नंतर पक्षाने त्यांना राज्यपाल म्हणून नियुक्त केले.

उमा भारती : उमा भारती यादेखील 6 डिसेंबरला अयोध्येत उपस्थित असलेल्या भाजप नेत्यांपैकी एक होत्या. त्यांच्यावर जातीयवादी भाषणे करणे आणि हिंसा करण्यास प्रवृत्त केल्याचा आरोप होता. सीबीआयने केलेल्या तपासणीत बाबरी मशीद विध्वंस प्रकरणात त्याच्यावर गुन्हेगारी कट रचल्याचादेखील आरोप होता, परंतु कोर्टाने त्यांची सुटका केली. इतर नेत्यांप्रमाणेच त्यांचे नावही विस्मृतीत गेलं आहे. मध्य प्रदेशात भाजपची ओळख निर्माण करणाऱ्या उमा भारती केंद्रीय राजकारणापासून दूर आहेतच, तसेच त्या त्यांच्या राज्यातील राजाकारणापासूनही खूप दूर आहेत. उमा भारतींनी राम मंदिरासाठीचे आंदोलन अधिक आक्रमक केले होते परंतु त्या राम मंदिराच्या पायाभरणीच्या कार्यक्रमाला उपस्थित राहतील, ही बातमी प्रसिद्ध झाल्यानंतर मोठा वाद झाला होता. मध्य प्रदेशात उमा भारतींनी भाजपची ओळख निर्माण केली. तसेच तिथे सत्तादेखील मिळवून दिली. परंतु आता त्यांचं नाव विस्मृतीत गेलं आहे.

संबंधित बातम्या

Babri Case | बाबरी विद्ध्वंस पूर्वनियोजित नव्हे, उत्स्फूर्त प्रतिक्रिया, अडवाणींसह सर्व आरोपी दोषमुक्त

Babri Case | बाबरी प्रकरणाच्या निकालानंतर असदुद्दीन ओवेसी CBI कोर्टाच्या निर्णयावर नाराज

(Babri Masjid Demolition : LK Advani, MM joshi, kalyan singh and Uma Bharti)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.