जावयाची गाढवावरुन जंगी मिरवणूक काढण्याची प्रथा, लपून बसलेल्या जावयांना शोधण्यासाठी पथकं

बीडमधील विडा (Beed Donkey procession) या गावात जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्याची परंपरा आहे.

जावयाची गाढवावरुन जंगी मिरवणूक काढण्याची प्रथा, लपून बसलेल्या जावयांना शोधण्यासाठी पथकं
Follow us
| Updated on: Mar 10, 2020 | 12:57 PM

बीड : होळी आणि धुलिवंदनाच्या अनोख्या परंपरा राज्यभर पाहायला मिळतात. बीडमधील विडा (Beed Donkey procession) या गावात जावयाची गाढवावरुन मिरवणूक काढण्याची परंपरा आहे. विडाकरांची ही अनोखी परंपरा गेल्या 82 वर्षांपासून सुरु आहे. बीड जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात धुलिवंदन साजरा करण्यात येतो. मात्र विडा गावातील प्रथा हटके (Beed Donkey procession) अशीच आहे. या गावातील जावयाला चक्क गाढवावर बसवून वाजत गाजत मिरवणूक काढण्यात येते. लग्नात घोड्यावरुन येणारे हे जावई होळीत मात्र गाढवावर बसलेले दिसतात.  ही अनोखी परंपरा जहागीरदार आनंदराव देशमुख यांनी सुरु केल्याचे त्यांचे वंशज सांगतात.

साडे सात हजार लोकसंख्या असलेल्या या विडा गावात 150 घरजावई कायम स्वरुपी वास्तव्यास आहेत. धुलीवंदनाच्या दोन दिवस अगोदार जावई शोधण्याची मोहीम गावकरी हाती घेतात. बरेच जावई गावकऱ्यांच्या सापळ्यातून निसटूनही जातात. कोणता जावई कुठे आहे याचा तपास करण्यासाठी गावात पथकही नेमले जाते. धुलिवंदनाच्या दिवशी त्या जावयाला पकडून गाढवावर बसविण्याची तयारी करण्यात येते.

यंदा मात्र अनेक तरूण जावई पोबारा केल्यानं मस्साजोग येथील जावई दत्तात्रय गायकवाड यांना गाठण्यात आलं.  त्यांची गाढवावर बसण्याकरीता वर्णी लागली. जावयाची मिरवणूक संपूर्ण गावातून वाजत गाजात काढण्यात येते. संपूर्ण गाव या मिरवणुकीत सहभाग घेते. तब्बल पाच तास मिरवणूक चालल्यानंतर मारुतीच्या मंदिराजवळ येऊन या जावयाला नवीन कपड्याचा आहेर दिला जातो.

एकदा गाढवावर बसविण्यात आलेल्या जावयाला दुसऱ्यांदा बसविण्यात येत नाही. सासरच्या मंडळीकडून अपेक्षा करीत रुसवा फुगवा करणारे जावई धुलिवंदनाला गपचूप गाढवावर बसतात. धुलिवंदनाच्या या आनंदात गावकऱ्यांसह ते सुद्धा सहभागी होतात. थट्टेतून जावयाचा सन्मान करणारे विडा हे गाव राज्यातच नाही तर संपूर्ण देशातले  एकमेव आहे.

Non Stop LIVE Update
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'
'शरद पवार पक्ष एकत्र ठेवू शकले ना कुटुंब, मोदी म्हणाले ते अगदी बरोबर'.
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार
आमदार सरनाईकांच्या कुटुंबातील वाहनाचा भीषण अपघात, पाच जण जागीच ठार.
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया
बहिणीने भावाला फोन केला असता...अंधारेंच्या अपघातावर कुणाची प्रतिक्रिया.
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?
मनसेच्या नेत्यावर 5 कोटींची खंडणी मागितल्याचा आरोप, कुणी केली तक्रार?.
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?
ज्यांनी पत्नीला सोडलं..., शरद पवारांवरील टीकेनंतर मोदींवर कुणाची टीका?.
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका
मोदी महानटसम्राट...काँग्रेसच्या बड्या नेत्याची पतंप्रधानांवर खोचक टीका.
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर
दादा आवाज येत नाही, अजितदादांकडून कार्यकर्त्यांची फिरकी, काय दिल उत्तर.
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय
ठाकरे गटाच्या 'त्या' जाहिरातीत पॉर्नस्टार? चित्रा वाघ यांचा आक्षेप काय.
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल
'तर मोदींनी ते कृत्य केलं नसतं', संजय राऊतांचा पंतप्रधानांवर हल्लाबोल.
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?
अंधारेंना घेण्यासाठी हेलिकॉप्टर आलं अन्...नको ते घडलं, नेमकं काय झालं?.