AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बीडच्या लंकाबाईंची 21 वी प्रसुती, ऊसाच्या फडात जन्मलेल्या अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू

राज्यात खळबळ उडवणाऱ्या आणि आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या बीडमधील प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले आहेत (21st delivery of Lankabai from Beed).

बीडच्या लंकाबाईंची 21 वी प्रसुती, ऊसाच्या फडात जन्मलेल्या अर्भकाचा दुर्दैवी मृत्यू
| Updated on: Dec 17, 2019 | 6:15 PM
Share

बीड : राज्यात खळबळ उडवणाऱ्या आणि आरोग्य खात्याची लक्तरे वेशीवर टांगणाऱ्या बीडमधील प्रकरणाला आणखी एक वळण मिळाले आहेत (21st delivery of Lankabai from Beed). 20 वेळा प्रसुती झालेल्या बीडच्या लंकाबाईंची 21 व्या वेळी प्रसुती झाली आहे. मात्र, बीड आरोग्य विभागाच्या दुर्लक्षामुळे लंकाबाई माजलगाव सोडून ऊस तोडणीसाठी थेट कर्नाटकात गेल्या. तेथेच त्यांची तीन दिवसांपूर्वी प्रसूती झाली. गर्भाशयाची योग्य काळजी न घेतल्याने नवजात स्त्री अर्भकाचा मृत्यू झाला (21st delivery of Lankabai from Beed).

लंकाबाई माजलगाव येथे भंगार वेचण्याचं काम करत होत्या. त्यांचा पती गाणं गाऊन कुटुंबाचं उदरनिर्वाह करत होते. कुटुंब कल्याण शस्त्रक्रियेबद्दल अनभिज्ञता आणि भीती मनात बसल्याने लंकाबाई यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करवून घेतलीच नाही. त्यामुळे त्यांची तब्बल 20 वेळा प्रसूती झाली. याबाबत सर्वप्रथम टीव्ही 9 मराठीने बातमी दिली. त्यानंतर आरोग्य प्रशासनाची मोठी तारांबळ उडाली.

लंकाबाई तीन महिन्यांपूर्वी ऊस तोडीच्या कामासाठी कर्नाटकात गेल्या. तीन दिवसांपूर्वी त्यांची ऊसाच्या फडातच प्रसुती झाली. बीड आरोग्य विभागाने काळजी घेतली असती, तर लंकाबाईंच्या नवजात मुलीचा मृत्यू झाला नसता असा आरोप सामाजिक कार्यकर्त्या सत्यभामा सौंदरमल यांनी केला आहे. त्यामुळे आरोग्य खात्याच्या कामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित राहत आहे. दरम्यान लंकाबाई यांचा अद्याप कोणताही संपर्क झालेला नाही.

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.