भावाला वाचवण्यासाठी दुसरा भाऊ नदीत उतरला, भिवंडीत मासे पकडण्यासाठी गेलेले दोन भाऊ बुडाले

| Updated on: Aug 29, 2020 | 10:45 PM

भिवंडी शहरा जवळून वाहणाऱ्या कामवारी नदीत मच्छी पकडण्यासाठी गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली.

भावाला वाचवण्यासाठी दुसरा भाऊ नदीत उतरला, भिवंडीत मासे पकडण्यासाठी गेलेले दोन भाऊ बुडाले
Follow us on

भिवंडी : भिवंडी शहरा जवळून वाहणाऱ्या कामवारी नदीत मासे पकडण्यासाठी (Bhiwandi Two Brothers Drowned In River) गेलेल्या दोन भावांचा बुडून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली. शहबाज अन्सारी (वय 24) आणि शाह आलम अन्सारी अशी दोघा भावांची नावे आहेत. हे दोघे मुंबई येथून नुकतेच मिल्लत नगर येथील रव्हेरा प्लाम्स अपार्टमेंटमध्ये राहायला आले होते (Bhiwandi Two Brothers Drowned In River).

आज सायंकाळी 4 वाजताच्या सुमारास हे दोघे भाऊ कामवारी नदीत चाविन्द्रा पेट्रोल पंपा मागे आपल्या आईसोबत मासे पकडण्यासाठी गेले होते. त्यावेळी एका भावाचा पाय घसरुन तो नदीच्या प्रवाहात वाहत जाऊ लागला. भावाला बुडताना पाहून दुसऱ्या भावाने आईजवळील दुप्पटा घेतला. बुडणाऱ्या भावाला वाचविण्यासाठी दुसरा भाऊ पाण्यात उतरला. मात्र, पाण्याचा अंदाज न आल्याने तो ही बुडू लागला.

दोन्ही मुलांना बुडताना पाहून आईने रस्त्याच्या दिशेने मदतीसाठी धाव घेतली. ही वार्ता मिल्लत नगर भागात पसरल्यानंतर स्थानिक नगरसेवक इम्रान खान यांनी कार्यकर्त्यांसह घटनास्थळी धाव घेऊन अग्निशामक दलास पाचारण केले (Bhiwandi Two Brothers Drowned In River).

दरम्यान, स्थानिक युवकांनी पाण्यात उतरुन शोध घेत साडे सात वाजताच्या सुमारास शाह आलम याचा मृतदेह बाहेर काढला. तर शहबाज अन्सारीच्या मृतदेहाचा शोध घेतला जात असून अंधार झाल्याने त्यामध्ये अडथळा येत आहे. दरम्यान, या दुर्दैवी घटनेत दोघा सख्ख्या भावांचा मृत्यू झाल्याने कुटुंबियांसह परिसरावर शोककळा पसरली आहे.

Bhiwandi Two Brothers Drowned In River

संबंधित बातम्या :

सेल्फी काढण्याचा नाद जीवावर, वर्ध्यात तलावात बुडून दोघांचा मृत्यू

इंजिनिअरींगचे सहा विद्यार्थी पोहण्यासाठी लळिंग धबधब्यावर, तिघांचा बुडून मृत्यू