सेल्फी काढण्याचा नाद जीवावर, वर्ध्यात तलावात बुडून दोघांचा मृत्यू

पावसाळ्यात धोक्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा नाद जीवावर (Wardha two people died by drowning)  बेतू शकतो.

  • चेतन व्यास, टीव्ही 9 मराठी, वर्धा
  • Published On - 20:24 PM, 5 Jul 2020
सेल्फी काढण्याचा नाद जीवावर, वर्ध्यात तलावात बुडून दोघांचा मृत्यू

वर्धा : पावसाळ्यात धोक्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा नाद जीवावर (Wardha two people died by drowning)  बेतू शकतो. याच सेल्फीच्या नादात वर्ध्यातील दोघांचा तलावात बुडून मृत्यू झाल्याची घटना घडली आहे. तेजस राजू चोपडे (15) आणि हर्षल संजय चौधरी अशी या दोघांची नावे आहे. तर सुदैवाने इतर चार जण बचावले आहेत.

पावसात अनेकांना धोक्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढण्याचा नाद असतो. हा सेल्फी जीवावर बेतू शकतो याचीही कल्पना अनेकांना असते. मात्र तरीही अनेकजण धोक्याच्या ठिकाणी जाऊन सेल्फी काढतात. अशाच प्रकारे वर्ध्यातील कारंजा तालुक्यातील उमरी परिसरातील 6 जण धावसा हेटी तलावात सेल्फी काढायला गेले होते. सेल्फी काढण्यापूर्वी काही काळ मित्र तलावाशेजारी फिरले आणि फोटो काढायला सुरुवात केली.

त्यानंतर तलावात असलेल्या एका विहिरीच्या बाजूला खोल खड्ड्याच्या बाजूला सेल्फी काढत होते. त्याच वेळी त्यातील एकाचा पाय घसरला. त्याला वाचवण्यासाठी गेलेल्या इतर चौघांपैकी आणखी एकजण तलावात पडला.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

साखळी करून एकमेकांना वाचवण्याच्या प्रयत्नात पाचही जण तलावात पडले. त्यांचा मित्रा धावसा (हेटी) हर्षल धनराज कालभुत हा बाहेर काही अंतरावर उभा होता. त्याच्या हे लक्षात येताच त्याने मित्र बुडत असताना धावत येऊन पाय दिला. यानंतर त्या तिघांना बाहेर काढले. मात्र इतर दोघांना वाचवण्यात अपयश आले.

आषाढी पौर्णिमेच्या दिवशी घटना घडल्याने दोन्ही गावात शोककळा पसरली आहे. ही घटना घडताच पोलीस प्रशासन घटनास्थळी पोहचली. त्यानंतर या बुडालेल्या युवकांना तलावातून बाहेर काढण्यात आले (Wardha two people died by drowning)  आहे.

संबंधित बातम्या : 

अहमदनगरमध्ये पिता-पुत्राची आत्महत्या, मुलाने गळफास घेतल्याचं पाहताच वडिलांनीही जीवन संपवलं

चोरलेले, हरवलेले 2100 मोबाईल पोलिसांनी शोधले, बहुतांश मोबाईल विद्यार्थ्यांकडून हस्तगत