Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेचा जामीन नामंजूर, कोर्टात काय घडलं?

| Updated on: Jun 24, 2019 | 9:17 PM

बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) चेक बाऊन्स प्रकरणी शुक्रवारी (21 जून) सातारा पोलिसांनी अटक केली होती. या प्रकरणी आज सातारा जिल्हा सत्र न्यायलयात सुनावणी झाली.

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेचा जामीन नामंजूर, कोर्टात काय घडलं?
Follow us on

Bigg Boss Marathi 2 सातारा : बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) चेक बाऊन्स प्रकरणी शुक्रवारी (21 जून) सातारा पोलिसांनी अटक केली होती. त्यानंतर सातारा जिल्हा सत्र न्यायलयाने त्याला खंडणी प्रकरणी जामीन नामंजूर केला. त्यानुसार आज (24 जून) साताऱ्यातील जिल्हा सत्र न्यायलयात खंडणी प्रकरणी पुढील सुनावणी पार पडली. यावेळी त्याला जामीन नामंजूर करण्यात आला असून त्याला 27 जूनपर्यंत न्यायलयीन कोठडी सुनावण्यात आली आहे.

कोर्टात काय घडलं?

अभिजीत बिचुकलेला एका चेक बाऊन्स प्रकरणात पोलिसांनी बिग बॉस मराठीच्या सेटवरुन अटक केली होती. त्यानंतर याप्रकरणी शनिवारी (22 जून) सातारा जिल्हा न्यायलयात हजर केले होते. त्यावेळी त्यांना या प्रकरणी जामीन मंजूर करण्यात आला होता. मात्र अभिजित बिचुकलेला खंडणी प्रकरणी जिल्हा न्यायालयाने जामीन फेटाळला होता. त्यामुळे बिचुकलेंची रवानगी बिग बॉसच्या घरातून थेट न्यायलयीन कोठडीत करण्यात आली होती. त्यानंतर आज (24 जून) या प्रकरणी सातारा जिल्हा सत्र न्यायलयाने याप्रकरणी सुनावणी केली. यावेळी न्यायधीशांनी बिचुकलेचा खंडणी प्रकरणातील जामीन अर्ज फेटाळला. त्यामुळे बिचुकलेला 27 जूनपर्यंत न्यायलयीन कोठडीत राहावे लागणार आहे.

यंदाच्या बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला एक चेहरा म्हणजे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale).. वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यामुळे बिचुकले अनेकदा चर्चेत आले आहेत.

अभिजीतची प्रतिक्रिया

दरम्यान या घटनेनंतर अभिजीत बिचुकलेंनी “या सर्व राजकीय खेळ्या असून यात मला अडकवलं जातंय,” अशी प्रतिक्रिया कोर्टात दाखल होण्यापूर्वी प्रसार माध्यमांना दिली होती. या प्रकरणात नक्कीच राजकीय हस्तपेक्ष आहे. राजकीय स्वार्थसाठी वकील संदीप सकपाळचा उपयोग केला जात आहे. साताऱ्यात बिग बॉसच्या कार्यक्रमात जाण्यापूर्वी  किंवा आता माझी चांगली प्रतिष्ठा आहे. मी विधानसभा निवडणुकीसाठी अर्ज करणार आहे. त्यामुळे संदीप सकपाळला अमिष दाखवून माझ्याविरोधात भडकवलं जात आहे. माझा कोर्टावर पूर्णपणे विश्वास असून या प्रकरणाचा लवकरच निकाल लागेल अशी मला खात्री आहे. असेही त्यांनी म्हटलं होतं.

नेमकं प्रकरण काय?

वकील संदीप सकपाळ यांनी फेब्रुवारी 2015 मध्ये खासगी कामासाठी अभिजीत बिचुकलेला 50 हजार रुपये दिले होते. काही महिन्यांनी मी तुम्हाला पैसे परत करेन असे बिचुकलेंनी सकपाळ यांना सांगितले होते. त्यानंतर सकपाळ यांना पैशाची गरज असताना त्यांनी पैसे परत करण्याची मागणी केली. मात्र त्याने पैसे देण्यास विरोध केला. त्यानंतर सकपाळ यांनी पैशासाठी बिचुकलेंच्या मागे तगादा लावल्यानंतर त्याने त्यांना 28 हजार रुपयांचा चेक दिला. सकपाळ यांनी तो क्लिअरन्ससाठी टाकल्यानंतर चेक बाऊन्स झाला. या कारणामुळे सकपाळ यांनी बिचुकलेंविरोधात 2015 मध्ये सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली होती.

कोण आहे अभिजीत बिचुकले ?

अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातील फेमस व्यक्तीमत्व आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले.

अभिजीत बिचुकले हा बिग बॉस मराठी सिझन 2 मधील सदस्य आहे.

अभिजीत बिचुकले स्वत:ला कवी म्हणवून घेतात. त्यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीपर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.

बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यासाठी प्रसिद्ध आहे

बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अल्पावधीतच प्रसिद्ध मिळाली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सातारा आणि सांगलीतून त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता.

संबंधित बातम्या 

अभिजीत बिचुकलेच्या जागी बिग बॉसमध्ये जाणार का? शितली म्हणते…

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकले बिग बॉसच्या घरातून थेट तुरुंगात

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक का आणि कशी झाली? वकिलांनी अख्खी स्टोरी सांगितली

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक, सातारा पोलिसांची मुंबईत येऊन कारवाई

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुपालीला थोबाडीत मारणार, आई संतप्त