Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक का आणि कशी झाली? वकिलांनी अख्खी स्टोरी सांगितली

बिचुकलेंना चेक बाऊन्स प्रकरणात पोलिसांनी बिग बॉस मराठीच्या सेटवरुन अटक केली. या प्रकरणी तक्रार करणाऱ्या वकील संदीप सकपाळ यांच्याशी टीव्ही 9 मराठीने बातचीत केली

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक का आणि कशी झाली? वकिलांनी अख्खी स्टोरी सांगितली
Follow us
| Updated on: Jun 22, 2019 | 2:34 PM

Bigg Boss Marathi – 2 मुंबई : बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला अभिजीत बिचुकलेला (Abhijeet Bichukale) काल (21 जून) सातारा पोलिसांनी अटक केली आहे. बिचुकलेंना चेक बाऊन्स प्रकरणात पोलिसांनी बिग बॉस मराठीच्या सेटवरुन अटक केली. या प्रकरणी तक्रार करणाऱ्या वकील संदीप सकपाळ यांच्याशी टीव्ही 9 मराठीने बातचीत केली आणि हे संपूर्ण प्रकरण काय याचा आढावा घेतला आहे.

“अभिजीत बिचुकले हा माझ्या चांगला परिचयाचा होता. जवळपास 7-8 वर्षापूर्वी त्याने साताऱ्यातील माझा मोकळा असलेला फॅल्ट वापरण्याची परवानगी मागितली होती. माझे नुकतेच लग्न झालं आहे, मी ज्या घरात राहतो ते फार लहान आहे. तसेच ते अंत्यंत जीर्ण अवस्थेत असल्याचे बिचकुलेंनी मला सांगितले. त्यामुळे मला तुमच्या मोकळ्या असलेल्या फॅल्टमध्ये रहायला परवानगी द्या, अशी विनंती त्याने माझ्याकडे केली. त्यानुसार मी त्याला त्या फॅल्टमध्ये राहण्यास परवानगी दिली,” असे संदीप सकपाळ यांनी सांगितले.

आम्ही रात्री फक्त झोपण्यासाठी तुमच्या फॅल्टमध्ये जाणार आहोत, कोणतेही सामान किंवा वस्तू आम्ही पुण्यातील बुधवार पेठेत असलेल्या घरातच ठेवणार आहोत असे बिचुकलेंनी सकपाळ यांना सांगितले.

“बिचुकले माझ्या ओळखीचे असल्याने मी त्याला अडअडचणीला लागेल ती मदत करायचो. त्याला फेब्रुवारी 2015 मध्ये खासगी कामासाठी 50 हजार रुपयांची गरज होती. त्यानुसार मी त्याला 50 हजार रुपयांची रोख  दिली. काही महिन्यांनी मी तुम्हाला पैसे परत करेन,” असे बिचुकलेंनी मला सांगितले होते.

त्यानंतर मला एकदा पैशाची गरज असताना, मी त्याला 50 हजार रुपये परत करावे अशी विनंती केली. मात्र त्याने त्याला विरोध केला. त्यानंतर मी त्याला कित्येकदा फोन केले. पण त्याला मोबाईल नंबर बदलण्याची फार सवय असल्याने त्याचा फोन लागत नव्हता, असेही सकपाळ यांनी ‘टीव्ही 9 मराठी‘शी बोलताना सांगितले.

“मी पैशासाठी त्याच्या मागे तगादा लावल्यानंतर 2015 मध्ये अखेर त्याने मला 28 हजार रुपयाचे एक चेक दिला. तो मी बँकेत क्लिअरन्ससाठी टाकल्यानंतर मात्र तो बाऊन्स झाला. चेक बाऊन्स झाल्याने मी त्याच्याविरोधात सातारा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली. त्यानंतर रितीसर केस उभी राहिल्यानंतर तो कोर्टात गैरहजर राहत होता. अनेकदा कोर्टाने त्याला नोटीस पाठवली, मात्र त्याचा काहीच फायदा झाला नाही. त्यानंतर अखेर कोर्टाने नाईलाज म्हणून वॉरंट काढत, कोर्टाने त्याला अटक केली. मात्र त्यावेळी न्यायधीशांसमोर गयावया करत त्याला जामीन मिळाला.”

जामीन मिळाल्यानंतर तो आतापर्यंत एकदाही न्यायलयात हजर राहिला नाही. तब्बल अडीच वर्षे तो फरार असून त्याने पोलीसांनाही चुना लावला आहे. बिचुकले घराच्या सेफ्टी दरवाजाला कुलूप लावून आत बसल्याने पोलिसांनी तो घरात नाही असे वाटायचे. म्हणून तो इतकी वर्ष अटकेत येत नव्हता.

मात्र त्यानंतर मला तो बिग बॉस मराठी मध्ये गेल्याचे समजले. त्यानंतर मी रितीसर याबाबत कोर्टात त्याला अटक करण्यासाठी अर्ज दाखल केला. त्यानुसार कोर्टाने अभिजीत बिचुकलेंना अटक करण्याची कोर्टाने ऑर्डर दिली आणि त्यामुळे काल सातारा पोलिसांनी मुंबईतील गोरेगावमध्ये बिग बॉस मराठीच्या सेटवरुन अभिजीत बिचुकलेला अटक केली

अभिजीत बिचुकले हे वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यामुळे बिचुकले अनेकदा चर्चेत आले आहेत.

संबंधित बातम्या 

Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक, सातारा पोलिसांची मुंबईत येऊन कारवाई

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुपालीला थोबाडीत मारणार, आई संतप्त  

Bigg Boss Marathi-2 : शिवने नेहाच्या टीमची इस्त्री चोरली

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन कोण?

Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

Bigg Boss Marathi – 2 : माझ्यामुळे मेघा धाडे ‘बिग बॉस’ जिंकली : शिवानी सुर्वे

Bigg Boss Marathi – 2 : ‘बिग बॉस मराठी-2’ मध्ये शिवानीच्या शूजची चर्चा

Non Stop LIVE Update
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी
लोकसभा निवडणुकीत लातूरमध्ये कोणाला लागणार ठसका? पाहा छोटा पुढारी.
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ
फेअरप्ले ॲप प्रकरणी तमन्ना भाटियाच्या अडचणीत वाढ.
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान
ठाकरेंनी 18 जागा जिंकून दाखवाव्यात, भाजप नेत्याचं ठाकरेंना आव्हान.
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका
मोदींच्या काळात महिलांना मंगळसूत्र विकावी लागली, राऊतांची मोदींवर टीका.
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर
शरद पवार गटाच्या जाहीरनाम्यातील दोन प्रमुख मुद्दे, वाचा सविस्तर.
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार
शरद पवार यांच्या 'लाव रे तो व्हिडीओ'वर देवेंद्र फडणवीस यांचा पलटवार.
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका
26 पक्षांची खिचडी, खिचडीचे लोक त्यांना नेता मानत नाहीत,फडणवीसांची टीका.
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी
बायकोची कामं ऐकावीच लागतील, नाहीतर... अजित दादांची फटकेबाजी.
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना
भाषण सुरू अन् नितीन गडकरी स्टेजवरच कोसळले, यवतमाळच्या पुसदमधील घटना.
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?
EVM-VVPAT च्या याचिकेवर सुप्रीम कोर्टात नेमकं काय घडल? काय दिला निकाल?.