Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक, सातारा पोलिसांची मुंबईत येऊन कारवाई

अभिजीत बिचुकलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सातारा पोलिसांनी मुंबईत येऊन अभिजीत बिचुकलेला अटक केली.

  • Publish Date - 2:33 pm, Fri, 21 June 19
Bigg Boss Marathi 2 : अभिजीत बिचुकलेला अटक, सातारा पोलिसांची मुंबईत येऊन कारवाई

Bigg Boss Marathi – 2 मुंबई : बिग बॉसच्या घरात वाद, भांडण, कुरघोड्या हे नेहमीच होत असतं. यंदाच्या बिग बॉस मराठी सिझन 2 मध्ये अल्पावधीतच प्रसिद्धी मिळालेला एक चेहरा म्हणजे अभिजीत बिचुकले (Abhijeet Bichukale).. वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यामुळे बिचुकले अनेकदा चर्चेत आले आहेत. आता अभिजीत बिचुकलेला मुंबई पोलिसांनी अटक केली आहे. सातारा पोलिसांनी मुंबईत येऊन अभिजीत बिचुकलेला अटक केली. 138 चेक बाऊन्स प्रकरणात पोलिसांनी बिचुकलेला बिग बॉस मराठीच्या सेटवरुन  अटक केली.

कोण आहे अभिजीत बिचुकले?

अभिजीत बिचुकले हे साताऱ्यातील फेमस व्यक्तीमत्व आहे. राष्ट्रपतीपदाची निवडणूक लढवण्यामुळे ते राज्यभर चर्चेत आले.

अभिजीत बिचुकले हा बिग बॉस मराठी सिझन 2 मधील सदस्य आहे.

अभिजीत बिचुकले स्वत:ला कवी म्हणवून घेतात. त्यांनी आतापर्यंत नगरसेवकापासून ते देशाच्या राष्ट्रपतीपदासाठीपर्यंतच्या अनेक निवडणुका लढवल्या आहेत.

साताऱ्याचे खासदार उदयनराजे भोसले यांनाही त्यांनी कित्येकदा खुलेआम आव्हान दिलं आहे.

बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्य करणे, टास्क खेळताना नियमांच्या विरुद्ध वागणे, घरातील महिला सदस्यांसोबत फर्ल्ट करणे यासाठी प्रसिद्ध आहे

बिग बॉसच्या घरात वादग्रस्त वक्तव्यामुळे त्यांना अल्पावधीतच प्रसिद्ध मिळाली आहे.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत सातारा आणि सांगलीतून त्यांनी उमेदवारी अर्जही भरला होता.

बिग बॉसच्या घरातील वादावादी

अभिजीत बिचुकले सध्या बिग बॉसमुळे चांगलाच चर्चेत आहे. बिग बॉसच्या घरात नुकत्याच झालेल्या टास्कमध्ये त्याची आणि अभिनेत्री रुपाली भोसलेची वादावादी झाली होती.

बिग बॉस मराठीच्या 24 व्या भागात बिग बॉसने घरातल्या सदस्यांना १ ते १० या क्रमांकांवर उभं राहण्याचा टास्क दिला होता. या टास्कदरम्यान अभिजित केळकर पहिल्या क्रमांकावर जाऊन उभा राहिला. किशोरी शहाणे दुसऱ्या क्रमांकावर, नेहा शितोळे तिसऱ्या तर अभिजित बिचुकले चौथ्या स्थानावर जाऊन उभे राहिले. या टास्कदरम्यान प्रत्येकाने आपण कोणता क्रमांक निवडला आणि का याचे स्पष्टीकरण द्यायचे होते.

या टास्कदरम्यान रुपाली भोसले सातव्या क्रमांकावर उभी राहिली. आपण इतरांच्या तुलनेत मागच्या क्रमांकावर असल्याने तिला राग आला आणि सगळा राग बिचुकलेंवर काढला. बिचुकले टास्कदरम्यान किंवा घरात कसे खोटं बोलतात, ते इतरांची फसवणूक कशी करतात हे सांगायला रुपालीने सुरुवात केली. मात्र बिचुकलेंनी आरोप फेटाळले, ज्यानंतर रूपाली भोसलेने बिचुकलेंना मुलीची शपथ घेण्यास सांगितले. हे ऐकल्यानंतर तिळपापड झालेल्या बिचुकलेंनी रूपाली भोसलेला अर्वाच्य भाषेत शिवीगाळ केली. शिव्यांचा भडीमार करतानाच बिचुकलेंनी चौथा क्रमांक सोडला आणि क्षणाचाही विलंब न लावता रुपाली चौथ्या क्रमांकावर जाऊन उभी राहिली. या टास्कमुळे बिग बॉसच्या घरात एक नवा वाद सुरु झाला आहे.

संबंधित बातम्या 

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून बाहेर येताच रुपालीला थोबाडीत मारणार, आई संतप्त  

Bigg Boss Marathi-2 : शिवने नेहाच्या टीमची इस्त्री चोरली

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन कोण?

Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

Bigg Boss Marathi – 2 : माझ्यामुळे मेघा धाडे ‘बिग बॉस’ जिंकली : शिवानी सुर्वे

Bigg Boss Marathi – 2 : ‘बिग बॉस मराठी-2’ मध्ये शिवानीच्या शूजची चर्चा