Bigg Boss Marathi-2 : शिवने नेहाच्या टीमची इस्त्री चोरली

एक डाव धोबीपछाड बिग बॉसने नेहा शितोळे टीम A मध्ये आणि विद्याधर जोशी टीम B अशा दोन टीम तयार केल्या. विद्याधर जोशी (बाप्पा) यांच्या टीममधील सदस्य शिवने नेहाच्या टीमची इस्त्री चोरुन ती लपवली. त्यामुळे आता पुढे काय होते हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.

Bigg Boss Marathi-2 : शिवने नेहाच्या टीमची इस्त्री चोरली

Bigg Boss Marathi मुंबई : बिग बॉस मराठीच्या घरामध्ये कालपासून (19 जून) एक डाव धोबीपछाड हे साप्ताहिक कार्य रंगत आहे. या टास्कदरम्यान दोन्हीही टीम एकमेकांना हरवण्यासाठी बऱ्याच योजना आखताना दिसत आहेत. काल बिग बॉसनी सांगितल्याप्रमाणे आता प्रत्येक टीम त्यांना पटेल त्याप्रमाणे योजना आखून दुसऱ्या टीमला मात देण्याच्या प्रयत्नात आहेत.

एक डाव धोबीपछाड या टास्कनुसार, एका टीमने कपडे धुवून ते व्यवस्थित वाळवायचे आहे. वाळल्यानंतर ते व्यवस्थित इस्त्री करुन ते कपडे दुसऱ्या टीमच्या मॅनेजरकडून मंजूर करुन घ्यायचे आहे. या टास्कद्वारे बिग बॉसच्या घरातील सदस्य उत्तम कामगार आहेत हे सिद्ध होणार आहे.

या कार्यासाठी बिग बॉसने नेहा शितोळे टीम A मध्ये आणि विद्याधर जोशी टीम B अशा दोन टीम तयार केल्या. यानुसार काल नेहाच्या टीमने कपडे धुतले. ते वाळल्यानंतर कपड्याला इस्त्री करावी आणि ते व्यवस्थित ठेवावे असे बिग बॉसने सांगितले आहे. हे लक्षात घेता, विद्याधर जोशी (बाप्पा) यांच्या टीममधील सदस्य शिवने नेहाच्या टीमची इस्त्री चोरुन ती लपवली. त्यामुळे आता या कार्यात रंगत चढत चालली आहे.

इतकंच नव्हे तर नेहाने कालच्या भागात विरोधी टीमचा मॅनेजर नसल्याने आमच्या टीमला विजेती टीम म्हणून घोषित करा असे कॅमेऱ्यासमोर सांगितले. तर यावर उत्तर देताना शिवने तुम्ही खेळू नका असे उत्तर नेहाला दिले. त्याला प्रत्युत्तर देताना नेहाने टीम ब्रेकर’ असे म्हटले.

त्यामुळे नेहाने टीम ब्रेकर नक्की कोणाला म्हटलं, हे नक्की कोणासाठी होते. याबाबत प्रेक्षकांमध्ये उत्सुकता पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे बाप्पाच्या टीमने नेहाची चोरलेली इस्त्री टीम शक्ती किंवा युक्तीचा वापर करत कशी परत मिळवतात? हे पाहणे आजच्या भागात महत्त्वाचे ठरणार आहे.

पाहा बिग बॉस मराठी-2 च्या सर्व बातम्या :

Bigg Boss Marathi-2 : बिग बॉसच्या घरातील नवा कॅप्टन कोण?

Bigg Boss Marathi – 2 : महेश मांजरेकरांनी परागची लाज काढली

Bigg Boss Marathi – 2 : बिग बॉसच्या घरातून शिवानी सुर्वेला हाकलले

Bigg Boss Marathi : शिवानीने घातली वीणाला लाथ, दोघीही अपात्र, शिक्षा काय?

Bigg Boss Marathi – 2 : माझ्यामुळे मेघा धाडे ‘बिग बॉस’ जिंकली : शिवानी सुर्वे

Bigg Boss Marathi – 2 : ‘बिग बॉस मराठी-2’ मध्ये शिवानीच्या शूजची चर्चा