Bill Gates CV: बाबो! बिल गेट्स यांचा रेझ्युमे तर बघा! कॉलेजमध्ये असताना केली होती ‘या’ विषयांची निवड

| Updated on: Jul 02, 2022 | 1:42 PM

Bill Gates Resume: जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असलेल्या बिल गेट्स यांनी त्यांचा पहिला बायोडाटा शेअर केला आहे. हा रेझ्युमे पाहिल्यानंतर जगभरातील लाखो लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो.

Bill Gates CV: बाबो! बिल गेट्स यांचा रेझ्युमे तर बघा! कॉलेजमध्ये असताना केली होती या विषयांची निवड
Image Credit source: Social Media
Follow us on

Bill Gates CV: रिझ्युमे! एक अत्यंत महत्त्वाची गोष्ट. आजच्या काळात नोकरी मिळवणं म्हणजे साधीसुधी गोष्ट नाही. बरेच हुशार सिनिअर्स सुद्धा तुम्हाला तेच सांगतील,” आधी रिझ्युमे चांगला बनव, मग काय टेन्शन नाही!” बरीच मुलं हा फंडा फॉलो सुद्धा करताना दिसतात. एक से बढकर एक रिझ्युमे असतात लोकांचे! रिझ्युमेचं (Resume) वाढणारं महत्त्व गुगलला (Google)सुद्धा माहित आहे. गुगलवर सुद्धा रिझ्युमेचे ढीगभर सॅम्पल उपलब्ध आहेत. अचानक रिझ्युमे चर्चेत कसा आला? कारण जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असलेल्या बिल गेट्स यांनी त्यांचा पहिला बायोडाटा/रिझ्युमे शेअर (Bill Gates CV) केला आहे. जो प्रचंड व्हायरल होतोय.

CV ही पहिली पायरी

आजच्या काळात, कोणत्याही नोकरीसाठी अर्ज करण्यापूर्वी, उमेदवाराला एक चांगला सीव्ही किंवा रेझ्युमे आवश्यक आहे. सीव्ही चांगला असेल तर नोकरी मिळणे सोपे जाते. नोकरीसाठी इच्छुक उमेदवारांना योग्य रिझ्युमे तयार करण्यात अनेकदा अडचणी येतात. त्यांना असा सीव्ही तयार करता येत नाही, जो त्यांनी केलेले काम व्यवस्थित दाखवू शकेल. अनेक नोकऱ्यांमध्ये चांगला सीव्ही ही पहिली पायरी असते, असेही दिसून येते.

हे सुद्धा वाचा

तुमचा रेझ्युमे माझ्या रेझ्युमेपेक्षा चांगला असेल – बिल गेट्स

त्याचवेळी जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत समाविष्ट असलेले बिल गेट्स यांनी त्यांचा पहिला बायोडाटा शेअर केला आहे. हा रेझ्युमे पाहिल्यानंतर जगभरातील लाखो लोकांचा आत्मविश्वास वाढू शकतो. आपल्या फॉलोवर्सला 66 वर्षीय गेट्स यांनी त्यांचा 48 वर्षा आधीचा रेझ्युमे शेअर दाखवलाय. बिल गेट्स म्हणाले की, आजच्या तरुणांचा बायोडाटा त्यांच्या बायोडाटापेक्षा चांगला दिसेल यावर त्यांचा पूर्ण विश्वास आहे. ते म्हणाले, ‘तुम्ही नुकतेच पदवीधर असाल किंवा कॉलेजमधून बाहेर पडलेला असलात तरी मला आशा आहे की तुमचा रेझ्युमे माझ्या 48 वर्षांच्या जुन्या रेझ्युमेपेक्षा चांगला असेल.

बिल गेट्स यांनी कॉलेजमध्ये कोणते कोर्स निवडले ते रेझ्युमे मध्ये सांगितलंय

वास्तविक, हा रेझ्युमे विल्यम हेनरी गेट्स तिसरा, हार्वर्ड कॉलेजच्या पहिल्या वर्षाला असतानाचा आहे. आज विल्यम हेनरी गेट्स तिसरे यांनाच बिल गेट्स म्हणून ओळखले जाते. मायक्रोसॉफ्टच्या बॉसने सांगितले की त्यावेळी त्यांनी ऑपरेटिंग सिस्टम स्ट्रक्चर, डेटाबेस मॅनेजमेंट, कॉम्प्युटर ग्राफिक्स आणि अशा इतर कोर्सेसमध्ये प्रवेश घेतला होता. बिल गेट्सने रेझ्युमे शेअर केल्यानंतर, अनेक फॉलोअर्सने सांगितले की त्यांचा रेझ्युमे पूर्णपणे परिपूर्ण आहे. तसेच फॉलोवर्सने त्यांचा बायोडाटा शेअर केल्याबद्दल आभार मानले.

बिल गेट्सच्या रेझ्युमेबद्दल त्यांचे फॉलोअर्स काय म्हणाले?

एम इस्माईल नावाच्या वापरकर्त्याने कमेंट केली की, ‘हा 48 वर्ष जुना रेझ्युमे आहे हे लक्षात घेता, आजही छान दिसतो.’ दुसरा वापरकर्ता म्हणाला, ‘बिल गेट्स, हे शेअर केल्याबद्दल धन्यवाद. आपण सर्वांनी आपल्या जुन्या बायोडाटा ची एक प्रत नेहमी जवळ बाळगली पाहिजे आणि ती तपासली पाहिजे. आपण आपल्या आयुष्यात किती मिळवले हे आपण अनेकदा विसरतो.