अमेरिकेच्या नागरिकांची फसवणूक, नालासोपाऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 10 जण ताब्यात

| Updated on: Oct 29, 2020 | 8:52 AM

मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तांच्या पथकाने नालासोपारा येथे सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे.

अमेरिकेच्या नागरिकांची फसवणूक, नालासोपाऱ्यातील बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश, 10 जण ताब्यात
Follow us on

नालासोपारा : नालासोपाऱ्यात बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश करण्यात आला आहे (Bogus Call Center). मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तांच्या पथकाने ही कारवाई केली आहे (Bogus Call Center).

मीरा-भाईंदर-वसई-विरार पोलीस आयुक्तांच्या पथकाने नालासोपारा येथे सुरु असलेल्या बोगस कॉल सेंटरचा पर्दाफाश केला आहे. याप्रकरणी 10 जणांना ताब्यात घेतलं असून त्यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

नालासोपारा पश्चिमेकडील यशवंत गौरव येथील सुंदरम प्लाझा येथे पहिल्या मजल्यावर बेसिन कॉल सेंटर या नावाने बोगस कॉल सेंटर चालवले जात होते. यात अमेरिकेतील नागरिकांना फसवलं जात होतं, अशी माहिती आहे.

हे लोक अमेरिकेतील नागरिकांना अमेरिकन सोशल एडमीन स्टेटचे अधिकारी असल्याचं सांगत कारवाईची भीती दाखवायचे आणि त्यांच्याकडून गिफ्ट कार्ड घेवून, त्यांच्या अकॉऊंटमधून पैसे कढायचे. याप्रकरणी पोलिसांनी 10 जणांना ताब्यात घेऊन तपासाला सुरुवात केली आहे.

Bogus Call Center

संबंधित बातम्या :

ओळखीचा गैरफायदा घेत अल्पवयीन मुलीवर अत्याचार; चार महिन्यानंतर नराधमाच्या मुसक्या आवळल्या

नागपुरात कुख्यात गुन्हेगाराला शिताफीने पकडलं, 2 लाखाचे ड्रग्ज जप्त

अल्पवयीन मुलीवर तरुणाचा अत्याचार, जीवे मारण्याची धमकी, नराधमाला अटक