
मुंबई : जेष्ठ बॉलिवूड अभिनेत्री दीप्ती नवल (Bollywood Actress Deepti naval) यांना रविवारी हृदयविकाराचा तीव्र झटका आल्याने त्यांना मोहालीतील फोर्टिस रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. अचानक छातीत दुखू लागल्याने त्यांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले. सध्या त्या त्यांच्या मोहालीतील घरी वास्तव्यास होत्या. त्यांच्या प्रकृतीत सुधारणा होत असल्याचे डॉक्टरांनी सांगितले आहे.( Bollywood Actress Deepti naval suffered a heart attack admitted in Mohali fortis hospital)
रविवारी दुपारच्या सुमारास दीप्ती नवल यांना हृदयविकाराचा झटका आला असल्याचे डॉक्टरांनी सांगितले. ऑपरेशननंतर त्यांची प्रकृती आता बरीच सुधारली आहे. अचानक प्रकृती बिघडल्याने रात्री अडीचच्या सुमारास त्यांचे ऑपरेशन करावे लागले. ऑपरेशन टीममध्ये फोर्टिस हॉस्पिटलच्या कार्डियाक विभागाचे हेड कार्डियाक सर्जन डॉ. आरके जयस्वाल आणि त्यांच्या टीमचा सहभाग होता.
पहिल्यांदाच त्यांना हृदयविकाराचा झटका आल्याचे म्हटले जात आहे. कार्डियाक रुग्णवाहिकेसह त्यांच्या देखरेखीसाठी एक डॉक्टरदेखील नेमण्यात आला आहे. लॉकडाऊन दरम्यान त्या मोहालीतील घरी गेल्या होत्या आणि तिथेच अडकून पडल्या होत्या.(Bollywood Actress Deepti naval suffered a heart attack admitted in Mohali fortis hospital)
Endlessly I roam
My inner wilderness,Picking moments
From life’s grays
And browns –Reminiscing,
Reflecting,
Reacting
To being alive!The rustle of dry twigs
Under my bare feetFar out,
On the burnt hillside,
A forest fire glows . . . pic.twitter.com/2v8AurzGyI— Deepti Naval (@DeeptiNaval) September 23, 2020
दीप्ती नवल यांनी अनेक हिंदी चित्रपटांत काम केले आहे. ‘जुनून’, ‘चश्मेबद्दूर’, ‘कथा’, ‘साथ-साथ’ सारख्या अनेक चित्रपटात त्यांचा अभिनय गाजला आहे. अभिनयाव्यतिरिक्त त्या उत्कृष्ठ चित्रकार आणि कवियत्रीदेखील आहेत. पंजाबमध्ये जन्मलेल्या दीप्ती नवल यांचे बालपण अमेरिकेत गेले. त्यांचे वडील अमेरिकेतल्या सिटी विद्यापीठात शिक्षक होते.(Bollywood Actress Deepti naval suffered a heart attack admitted in Mohali fortis hospital)
अभिनय क्षेत्रात येण्याचे निश्चित करून त्यांनी भारतात स्थायिक होण्याचा निर्णय घेतला. 1978मध्ये श्याम बेनेगल याच्या ‘जुनून’ चित्रपटातून त्यांनी मनोरंजनविश्वात पदार्पण केले. या चित्रपटानंतर त्यांनी कधीच मागे वळून पहिले नाही. त्यांच्या अभिनयाने अनेक चित्रपट सुपरडुपर हिट ठरले.
‘मला आज रुग्णालयातून डिस्चार्ज दिला जाईल. सध्या डिस्चार्जची प्रक्रिया सुरू आहे. डिस्चार्जनंतर चार ते पाच दिवस मी चंडीगडमध्ये थांबेन आणि नंतर पुन्हा मनालीला रवाना होईन’, अशी माहिती खुद्द दीप्ती नवल यांनी एका वाहिनीशी बोलताना दिली आहे. याचबरोबर इतक्या कठीण परीस्थित काळजी घेणाऱ्या डॉक्टरांचे त्यांनी आभार मानले आहेत.
(Bollywood Actress Deepti naval suffered a heart attack admitted in Mohali fortis hospital)