गानसम्राज्ञी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल

ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना श्वसनाच्या त्रासानंतर (Lata Mangeshkar admited in Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे.

गानसम्राज्ञी लता मंगेशकर रुग्णालयात दाखल

मुंबई: ज्येष्ठ गायिका लता मंगेशकर यांना श्वसनाच्या त्रासानंतर (Lata Mangeshkar admited in Hospital) रुग्णालयात दाखल करण्यात आल्याची माहिती समोर येत आहे. आज (11 नोव्हेंबर) श्वास घेताना त्रास होत असल्याने त्यांना ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्यावर रुग्णालयातील वरिष्ठ डॉक्टर फारुख उदवाडीया यांच्या देखरेखीत उपचार सुरु असल्याचीही माहिती सूत्रांनी दिली आहे. लता मंगेशकर यांना (Lata Mangeshkar admited in Hospital) मध्यरात्री दीड वाजता रुग्णालयात दाखल केलं असून सध्या त्यांची प्रकृती स्थिर आहे.

लता मंगेशकर यांना छातीत संसर्ग झाल्याने रुग्णालयात दाखल केल्याची माहिती देण्यात आली आहे. त्यानंतर त्यांना आज ब्रिच कँडी रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्यांच्या प्रकृतीत वेगाने सुधारणा होत आहे.

विशेष म्हणजे लता मंगेशकर यांनी 10 नोव्हेंबरला ट्विट करत पद्मिनी कोल्हापुरे यांचं कौतुक केलं होतं. पद्मिनी कोल्हापुरे यांनी पानीपत चित्रपटात केलेल्या भूमिकेची माहिती त्यांनी या ट्विटमध्ये दिली. तसेच चित्रपट निर्माते आशुतोष गोवारीकर आणि त्यांच्या टीमलाही शुभेच्छा दिल्या होत्या.

लता मंगेशकर या 28 सप्टेंबर रोजी 90 वर्षांच्या झाल्या. त्यांच्या जन्मदिनी अनेक दिग्गज कलाकारांनी लता मंगेशकर यांना शुभेच्छा दिल्या होत्या. यात धर्मेंद्र, हेमा मालिनी, ऋषी कपूर, माधुरी दिक्षित, ए. आर. रेहमान, श्रेया घोषाल आणि अनिल कपूर आदींचा समावेश होता.

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *