जावयासोबत लिव्ह इनमध्ये, वादावादीतून सासूची हत्या

मध्य प्रदेशात एका व्यक्तिने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या (Boy murder live in partner in bhopal) केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे.

जावयासोबत लिव्ह इनमध्ये, वादावादीतून सासूची हत्या
| Edited By: | Updated on: Oct 22, 2019 | 9:39 AM

भोपाळ : मध्य प्रदेशात एका व्यक्तिने आपल्या लिव्ह इन पार्टनरची हत्या (Boy murder live in partner in bhopal) केली आहे. या धक्कादायक घटनेमुळे परिसरात एकच खळबळ उडाली आहे. विशेष म्हणजे हत्या (Boy murder live in partner in bhopal) करण्यात आलेली महिला आरोपीची सासू आहे. नात्याला काळीमा फासलेली ही धक्कादायक घटना भोपाळच्या अशोक गार्डन येथील आहे. शाहीन असं या मृत महिलेचं नाव आहे.

शाहीन आपल्या जावयासोबत लिव्ह इनमध्ये राहत होती. शनिवारी (19 ऑक्टोबर) दोघांमध्ये वाद झाला. यानंतर आरोपी शाहरुखने धार धार शस्त्राने शाहीनच्या गळ्यावर वार केले. यामध्ये तिचा मृत्यू झाला, असं सांगितलं जात आहे.

शाहीन देह व्यापर करत होती. यावरुन दोघांमध्ये अनेकदा वाद झाले होते. शाहरुखचा देह व्यापार करण्यासाठी विरोध होता. पण शाहीन त्याचे ऐकत नव्हती. त्यामुळे त्याने शाहीनची हत्या केली. हत्येनंतर त्याने आपल्या मित्राला फोन केला आणि घटनास्थळावरुन पळ काढला.

यानंतर तातडीने पोलीस घटनास्थळी पोहचले. शाहीनचा मृतदेह पोलिसांनी शव विच्छेदनासाठी रुग्णालयात पाठवला असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत. आरोपीवर गुन्हा दाखल केला असून पोलीस शोध घेत आहेत.

दरम्यान, काही वर्षांपूर्वी शाहरुखचे लग्न शाहीनच्या मुलीसोबत झाले होते. पण लग्नानंतर शाहरुख आणि त्याच्या सासूमध्ये अनैतीक संबध बनले. त्यानंतर शाहीनने आपल्या पतीकडून तलाक घेतला आणि तिच्या मुलीने शाहरुखला सोडून दिले. यानंतर शाहरुख आणि शाहीन एकत्र राहू लागले.