इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात, पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार

अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पेण तालुक्यातील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली (Sexual Harassment Raigad) आहे.

इन्स्टाग्रामवरील मैत्री महागात, पेणमध्ये अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार
| Edited By: | Updated on: May 22, 2020 | 5:09 PM

रायगड : अल्पवयीन मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याप्रकरणी पेण तालुक्यातील एका तरुणाला पोलिसांनी अटक केली (Sexual Harassment Raigad) आहे. ही घटना पेण तालुक्यातील रोडे-काश्मीरे येथे घडली. इन्स्टाग्रामवरुन आरोपी तरुण आणि पीडित तरुणीची ओळख झाली होती. अटक करण्यात आलेल्या तरुणाला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. प्रशांत पाटील असं आरोपीचे नाव (Sexual Harassment Raigad) आहे.

रोडे-काश्मीरे येथील रहिवासी प्रशांत सदाशिव पाटील याने एका अल्पवयीन मुलीसोबत इन्स्टाग्रामवर मैत्री केली होती. ही मुलगी 11 मार्च 2020 रोजी कॉलेजवरून एकटीच पायी घरी येत होती. यावेळी आरोपी तरुणाने तिचा पाठलाग करुन तिच्या प्रेम प्रकरणाबाबत आई-वडीलांना सांगेन, असे धमकावले. त्यानंतर आरोपी तरुणीला ब्लॅकमेल करु लागला. तसेच तिला मुंबई-गोवा महामार्गावरील लॉजवर नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केला. लैंगिक अत्याचार केल्याची फिर्याद या पीडित मुलीने पेण पोलीस ठाण्यात दाखल केली.

पीडित तरुणीच्या फिर्यादीनंतर प्रशांत पाटील याला अटक करण्यात आली असून, त्याच्याविरोधात बाल लैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला सहा दिवसांची पोलीस कोठडी देण्यात आली आहे. या प्रकरणाचा तपास पोलीस निरीक्षक बाळकृष्ण जाधव यांच्या मार्गदर्शनाखाली सहाय्यक पोलीस निरीक्षक एस.एन.पिंपळे करीत आहेत.

संबधित बातम्या :

धक्कादायक! झारखंडमध्ये अल्पवयीन तरुणीवर तीन महिन्यात 30 वेळा बलात्कार

अल्पवयीन तरुणीचा विनयभंग, युवासेनेच्या कार्यकर्त्याला नागरिकांचा चोप