गटारीच्या पार्श्वभूमीवर Budweiser प्रेमींना धक्का, बिअर कंपनीवर 3 वर्षाची बंदी

| Updated on: Jul 31, 2019 | 9:24 AM

सर्वात महागडी दारु बनवणारी कंपनी अशी ओळख असणाऱ्या Anheuser-Busch InBev (AB InBev) या कंपनीवर दिल्लीत 3 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. या कंपनीने कर न भरल्याने त्यांच्यावर दिल्ली सरकारने ही कारवाई केली आहे.

गटारीच्या पार्श्वभूमीवर Budweiser प्रेमींना धक्का, बिअर कंपनीवर 3 वर्षाची बंदी
Follow us on

नवी दिल्ली : सर्वात महागडी दारु बनवणारी कंपनी अशी ओळख असणाऱ्या Anheuser-Busch InBev (AB InBev) या कंपनीवर दिल्लीत 3 वर्षांसाठी बंदी घालण्यात आली आहे. या कंपनीने कर न भरल्याने त्यांच्यावर दिल्ली सरकारने ही कारवाई केली आहे. Budweiser, Hoegaarden आणि Stella Artois यांसारख्या अनेक प्रसिद्ध बिअर बनवणारी AB InBev या कंपनीची ओळख आहे.

AB InBev ही एक बिअर बनवणारी कंपनी आहे. 2016 मध्ये या कंपनीने SABMiller या कंपनीला 100 बिलीयन डॉलरमध्ये खरेदी केले होते. गेल्या काही वर्षांपासून कंपनीला टॅक्स कमी भरायला लागावा या हेतूने SABMiller या कंपनीच्या बॉटलवर डुप्लीकेट बारकोड्स लावण्यात येत होते. ही बाब दिल्ली सरकारला समजली. त्यानुसार दिल्ली सरकार गेल्या 3 वर्षांपासून याची चौकशी करत होते. त्यात दोषी आढळल्याने दिल्ली सरकारने AB InBev या कंपनीवर 3 वर्षाची बंदी घातली आहे.

मात्र AB InBev  या कंपनीने हे आरोप खोटे असल्याचा दावा केला आहे. तसेच याविरोधात आम्ही कोर्टात धाव घेणार असल्याचेही कंपनीने सांगितले आहे.

दरम्यान गेल्या आठवड्यात दिल्ली सरकारने AB InBev या प्रसिद्ध दारु विक्रेत्या कंपनीला 3 वर्षांसाठी काळ्या यादीत टाकलं आहे. रॉयटर्स या वृत्तसंस्थेने दिलेल्या माहितीनुसार, AB InBev कंपनीची दिल्लीतील दोन गोडाऊनही सील करण्याचे आदेशही दिले आहे. दरम्यान दिल्ली सरकारच्या या कारवाईमुळे AB InBev या दारु विक्रेत्या कंपनीला मोठा फटका बसण्याची शक्यता आहे

बिअर बनवणारी AB InBev  ही कंपनी भारतात दुसऱ्या क्रमांकाचा ब्रँड म्हणून ओळखली जाते. भारतीय बिअर बाजारात या कंपनीचे 17.5 टक्के हिस्सा आहे. या कंपनीचा एकूण टर्नओव्हर 7 बिलियन डॉलर आहे.