AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

बुलडाण्यातील मायलेकाची अकोल्यात आत्महत्या, नदीत उडी घेत आयुष्याची अखेर

दोघांनी घरगुती कारणातून आत्महत्या केली की अन्य कुठल्या कारणाने, याचा तपास पोलीस करत आहेत (Buldana Mother Son Suicide Akola)

बुलडाण्यातील मायलेकाची अकोल्यात आत्महत्या, नदीत उडी घेत आयुष्याची अखेर
बुलडाण्यातील मायलेकाची अकोल्यात आत्महत्या
| Updated on: Apr 15, 2021 | 3:23 PM
Share

अकोला : अकोला जिल्ह्यातील मन नदीत 15 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळल्याने एकच खळबळ उडाली. त्यातच, तरुणासोबतच त्याच्या आईनेही नदीत उडी घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं. मायलेकाच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप स्पष्ट झालेलं नाही. दोघेही जण बुलडाण्याचे रहिवासी असल्याचं समोर आलं आहे. (Buldana Mother Son Commits Suicide in Akola Man River)

अकोला जिल्ह्यातील बाळापूर येथील मन नदीत 15 वर्षीय तरुणाचा मृतदेह आढळला. तर त्याच्या आईचा मृतदेह शोधायला संत गाडगेबाबा आपत्कालीन पथकाला बोलवण्यात आले. मयत मायलेक बुलडाणा जिल्हातील रहिवासी असल्याची प्राथमिक माहिती मिळाली आहे.

दोघांनी घरगुती कारणातून आत्महत्या केली की अन्य कुठल्या कारणाने, याचा तपास बालापुर पोलीस करत आहेत. मात्र मायलेकाचा मृतदेह मन नदीतून बाहेर काढला जात असताना पुलावर बघ्यानी गर्दी केली होती.

नांदेडमध्येही मायलेकाची आत्महत्या

दरम्यान, कोरोनामुळे पतीचं निधन झाल्याचा धक्का बसल्याने पत्नीने मुलासह आत्महत्या केल्याची घटना नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात घडल्याचे समोर आले आहे. कोरोना संसर्गानंतर उपचारादरम्यान पतीची प्राणज्योत मालवल्याचं समजताच पत्नीने थेट तलाव गाठला. दोन मुलींना घरी ठेवून तिने धाकट्या मुलासह आयुष्य संपवलं.

नेमकं काय घडलं?

तेलंगणातून गंदम कुटुंब नांदेड जिल्ह्यातील लोहा शहरात मजुरीसाठी आलं होतं. बालाजी मंदिराच्या पाठीमागे राहून मजुरी करत ते उदरनिर्वाह करत होते. दरम्यानच्या काळात 40 वर्षीय पती शंकर गंदम यांना कोरोनाचा संसर्ग झाला. त्यांना लोहा येथील कोव्हिड सेंटरमध्ये उपचारासाठी दाखल करण्यात आले. परंतु मंगळवारी उपचारादरम्यान शंकर यांनी अखेरचा श्वास घेतला.

पतीच्या निधनाची बातमी समजताच पद्मा गंदम यांच्यावर दुःखाचा डोंगर कोसळला. पतीच्या पश्चात जगण्याची कल्पना असह्य झाल्याने त्यांनीही आयुष्य संपवण्याचा निर्णय घेतला. तीन वर्षांचा मुलगा लल्ली याच्यासह पद्मा यांनी सुनेगाव येथील तलाव गाठलं. दोघी मुलींना घरी ठेवून त्यांनी धाकट्या लेकासह तलावात उडी घेतली.

संबंधित बातम्या :

कोरोनाने पतीचा अखेरचा श्वास, दोन मुलींना घरी ठेवून पत्नीची मुलासह आत्महत्या

हनिमून कपलला काकीने ड्रग्ज प्रकरणात अडकवले, दाम्पत्य दोन वर्षांनी बाळासह कतारहून मुंबईला

(Buldana Mother Son Commits Suicide in Akola Man River)

कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल
कल्याण डोंबिवली महापालिकेत शिवसेनेचाच महापौर बसेल.
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?
हर्षवर्धन पाटलांच्या कन्या घड्याळ चिन्हावर झेडपी निवडणूक लढणार?.
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने...
लातूरमध्ये मोठ्या घडामोडी, ZP निवडणुकीसाठी शेवटचा दिवस असल्याने....
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?
KDMC मध्ये मोठा गेम? या पक्षाच्या मदतीने होणार शिंदेंचा महापौर?.
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा
गणितं बदलू शकत नाही, पण चित्र बदलेल, संजय राऊतांचा सूचक इशारा.
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका
दावोसमध्ये मुख्यमंत्र्यांची पिकनिक; संजय राऊतांची खोचक टीका.
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?
महाराष्ट्राचं पालघर गुजरातमध्ये विलीन झालं का?.
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन
पालघरमध्ये12 मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ठिय्या आंदोलन.
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की...
मुंबईचा महापौर कुणाचा? दिल्लीतून ठरणार की....
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक
वाशीममध्ये लाडक्या बहिणीचा हप्ता बंद झाल्याने महिला आक्रमक.