
साखरेमुळे देखील युरिक एसिड वाढत असते.तसेच सोडीमय म्हणजे मीठाचे पदार्थ जादा खाल्ल्याने देखील शरीरात युरिक एसिड वाढून किडनीवर परिणाम होत असतो. सोडियम रक्तदाब आणि किडनीच्या फिल्टरिंगवर देखील परिणाम होतो.

युरिक एसिडचे प्रमाण अनियंत्रित प्रमाणात वाढले तर शरीरात संधीवात वाढून सांध्यात तर दुखायला सुरु होते. शिवाय संशोधनात असे आढळलेय की जास्तच प्रमाणात जर युरिक एसिड वाढले तर किडनी देखील डॅमेज होऊ शकते.

युरिक एसिडची पातळी कमी करण्यासाठी दिवसातून साधे पाणी भरपूर पिले तरी फायद्याचे आहे. कोमट पाण्यात लिंबू पिळून ते पाणी प्यायल्याने देखील युरिक एसिड कमी होण्यास मदत मिळते.

रेड मीट किंवा ऑर्गन मीट यात प्युरीनचे प्रमाण जादा असल्याने तुमच्या शरीरात त्यामुळे युरिक एसिडची पातळी वाढण्याचे शक्यता वाढत असते. एका अभ्यासात आढळलेय की जर लाल रंगाच्या फ्रेश चेरी खाल्ल्या तर युरिक एसिडची लेव्हल झटक्यात कमी होते.

किडनीवरील सोडियमचा वापर टाळायचा असेल तर स्वयंपाकात रॉक सॉल्ट किंवा गुलाबी हिमालयीन मीठ वापरावे, सॉस, पॅकेज फूड, रेडी टू इट पदार्थ खाणे बंद करावे.

दिवसातून सकाळी झोपेतून उठल्यानंतर स्नायूंना स्ट्रेच करण्याची योगासनं आणि हलका व्यायाम रोज करावा, त्यामुळे शरीरातील रक्ताभिसरण वाढून युरिक एसिडची पातळी कमी होण्यास मदत होते.