Car sales : गाडी घ्यायचा विचार करत असाल तर ही लिस्ट बघा, कोणत्या गाड्या नव्या वर्षात टॉपवर?

| Updated on: Feb 03, 2021 | 6:34 PM

सर्वच कंपन्यांच्या कार आणि मोठ्या गाड्यांची चांगल्या प्रमाणात विक्री झालाचं अहवालातून समोर आलं आहे. यातही सर्वात जास्त मारुती सुझुकीच्या गाड्यांची विक्री नोंदली गेली आहे.

Car sales : गाडी घ्यायचा विचार करत असाल तर ही लिस्ट बघा, कोणत्या गाड्या नव्या वर्षात टॉपवर?
Follow us on

मुंबई : कोरोना महामारीमुळे ऑटोमोबाईल क्षेत्रावर आलेली मंदी आता हटताना दिसत आहे. कारण 2021 या नव्या वर्षाचा पहिला महिना सर्वच ऑटोमोबाईल कंपन्यांसाठी चांगला राहिलाय. सर्वच कंपन्यांच्या कार आणि मोठ्या गाड्यांची चांगल्या प्रमाणात विक्री झालाचं अहवालातून समोर आलं आहे. यातही सर्वात जास्त मारुती सुझुकीच्या गाड्यांची विक्री नोंदली गेली आहे. जानेवारी महिन्यात विकल्या गेलेल्या कारची नावं पाहिली तर टॉप 5 च्या सर्व कार या मारुती सुझुकीच्या आहेत.(Maruti Suzuki tops car sale company in January 2021)

तस पाहिलं गेलं तर भारतात सर्वाधिक कार विक्री ही मारुती सुझुकी या कंपनीची होत आली आहे. मात्र जानेवारीत विकल्या गेलेल्या टॉप 10 कारमध्ये मारुती सुझुकीच्या 7 कार आहे. तर उर्वरित 3 कार ह्युंदाई मोटार्सच्या आहेत. जानेवारी महिन्यात मारुती सुझुकीच्या एकूण 1 लाख 39 हजार 2 कार विकल्या गेल्या आहे. पण 2020च्या तुलनेत ही संख्या 1 टक्क्याने कमीच आहे.

Maruti Suzuki Alto

जानेवारी महिन्यात भारतीय बाजारात सर्वाधिक विक्री झालेल्या कारच्या यादीत मारुतीच्या Alto ने बाजी मारली आहे. जानेवारीमध्ये मारुती Alto च्या एकूण 18 हजार 260 कार विकल्या गेल्या आहेत. जानेवारी 2020च्या तुलनेत हा आकडा कमीच आहे.

Maruti Suzuki Swift

दुसऱ्या क्रमांकावर मारुती सुझुकी Swift या कारचा नंबर लागतो. मारुतीच्या या हॅचबॅक कारचे जानेवारी महिन्यात 17 हजार 180 युनिट्स विकले गेले आहेत. स्वाभाविकरित्या गेल्या वर्षीच्या जानेवारीतील विक्रीपेक्षा ही विक्री कमी आहे.

Maruti Suzuki WagonR

जानेवारी 2021 मध्ये मारुती सुझुकी WagonRचे 17 हजार 165 युनिट्स विकले गेले आहेत. विक्रीबाबत या कारचा तिसरा क्रमांक लागतो. इथे मात्र जानेवारी 2020च्या तुलनेत WagonR त्या कार विक्रीमध्ये 12.69 टक्के वाढ झाल्याचं दिसून येत आहे.

Maruti Suzuki Baleno

कार विक्रीमध्ये मारुती सुझुकी Baleno ने चौथा क्रमांक पटकावला आहे. जानेवारी 2021 मध्ये Balenoचे 16 हजार 648 युनिट्स विकले गेले आहेत. जानेवारी 2020च्या तुलनेत मात्र ही विक्री कमी आहे.

Maruti Suzuki Dzire

कार विक्रीमध्ये मारुती सुझुकी Dzire ही पाचव्या क्रमांकावर आहे. जानेवारीमध्ये Dzireचे एकूण 15 हजार 125 युनिट्स विकले गेले आहेत. जानेवारी 2020च्या तुलनेत मात्र ही विक्री 32 टक्के घटली आहे. जानेवारी 2020 मध्ये Dzireचे 22 हजार 406 युनिट्स विकले गेले होते.

Hyundai Creta

कार विक्रीमध्ये सहाव्या क्रमांकावर ह्युंदाईची बेस्ट सेलिंग SUV क्रेटा आहे. जानेवारी महिन्यात या कारचे एकूण 12 हजार 284 युनिट्स विकले गेले आहेत. महत्वाची बाब म्हणजे जानेवारी 2020च्या तुलनेत या कारची विक्री तब्बल 78 टक्क्यांनी वाढली आहे. जानेवारी 2020 मध्ये या कारचे 6 हजार 900 युनिट्स विकले गेले होते.

Hyundai Venue

कार विक्रीमध्ये Hyundai Venue सातव्या क्रमांकावर आहे. या कारचे 11 हजार 779 युनिट्स विकले गेले आहेत. तर आठव्या क्रमांकावर मारुती सुझुकीची ईको आहे. नवव्या क्रमांकावर ह्युंदाई Grand i10 Nios तर दहाव्या क्रमांकावर मारुती सुझुकीची विटारा ब्रेजा आहे.

संबंधित बातम्या :

इलेक्ट्रिक सनरूफ फंक्शन आणि कनेक्टेड कार टेकसह 2021 Mahindra XUV300 लाँच, जाणून घ्या किंमत

जानेवारीत दुचाकी वाहनांची विक्री वाढली, Honda, Yamaha चा मार्केटमध्ये जलवा

Maruti Suzuki tops car sales in January 2021