इलेक्ट्रिक सनरूफ फंक्शन आणि कनेक्टेड कार टेकसह 2021 Mahindra XUV300 लाँच, जाणून घ्या किंमत

ऑल न्यू पेट्रोल ऑटोशिफ्ट ट्रान्समिशन टेक्नोलॉजीसह महिंद्राने (Mahindra) मंगळवारी XUV300 लाँच केली आहे.

इलेक्ट्रिक सनरूफ फंक्शन आणि कनेक्टेड कार टेकसह 2021 Mahindra XUV300 लाँच, जाणून घ्या किंमत
Mahindra Xuv300

मुंबई : ऑल न्यू पेट्रोल ऑटोशिफ्ट ट्रान्समिशन टेक्नोलॉजीसह महिंद्राने (Mahindra) मंगळवारी XUV300 लाँच केली आहे. नवीन ऑटोमॅटिक ट्रान्समिशनशिवाय या गाडीमध्ये ब्लू सेन्स प्लस कनेक्टेड SUV टेक्नोलॉजीदेखील दिली जाणार आहे. नवीन XUV300 ऑटोशिफ्टची सुरुवातीची किंमत 9.95 लाख रुपये इतकी आहे. कंपनीने घोषणा केली आहे की, नवीन पेट्रोल ऑटोशिफ्ट मॉडलची डिलीव्हरी फेब्रुवारी महिन्यातच सुरु केली जाईल. (2021 Mahindra XUV300 launched with AutoSHIFT transmission, connected car tech)

XUV300 मध्ये इलेक्ट्रिक सनरूफ फंक्शन दिलं जाणार आहे. हे फंक्शन केवळ मिड वेरिएंट वर्जनमध्येच दिलं जाईल. नव्या एडिशनशिवाय कंपनीने या कारमध्ये अनेक कलर ऑप्शनही दिले आहेत. ज्यामध्ये डुअल टोन रेड आणि डुअल टोन अॅक्वामरीनचा समावेश आहे. नवीन कनेक्टेड SUV टेक्नोलॉजी ब्लूसेन्स प्लसमध्ये तुम्हाला अनेक फिचर्स मिळतील. यामध्ये रिमोट डोर लॉक/ अनलॉक, लाइव्ह व्हीकल ट्रॅकिंग, सेफ्टी अँड सिक्योरिटी फिचर्स, व्हीकल इन्फॉर्मेशन अलर्ट्स आणि इतर फिचर्सचा समावेश आहे.

कसं आहे महिंद्रा XUV300 पेट्रोल वेरिएंट?

नवीन इंजिन गियरबॉक्स कॉन्फिग्रेशनसह XUV300 मध्ये 110hp, 1.2 लीटर टर्बो पेट्रोल इंजिन आणि 6 स्पीड गियरबॉक्स देण्यात आला आहे. डीजल एएमटी वेरिएंट्सबाबत बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला एएमटी गियरबॉक्स ऑप्शन मिड स्पेक W6 आणि फुल्ली लोडेड W8 (O) ट्रिम लेवल्स मिळेल.

W8 (O) एएमटी मध्ये ऑटो हेडलॅम्प्स, डुअल झोन क्लायमेट कंट्रोल, कीलेस एंट्री आणि 7.0 इंचांची टचस्क्रीन मिळते, जी अँड्रॉयड ऑटो आणि अॅपल कार प्लेसह मिळते. यामध्ये तुम्हाला 7 एयरबॅग, ESC, हिल स्टार्ट असिस्ट, रियर व्ह्यू कॅमेरा आणि फ्रंट पार्किंग सेन्सर्स मिळतात.

सेफ्टी फिचर्स

महिंद्रा XUV300 ही भारतातील सर्वात सुरक्षित मेड इन इंडिया कार आहे. या कारला ग्बोबल NCAP ने 5 स्टार रेटिंग दिलं आहे. या कारला मुलांच्या सुरक्षिततेच्या बाबतीत 3 स्टार रेटिंग देण्यात आलं आहे. भारतात तयार करण्यात आलेली ही कार दमदार आहेच, तितकीच सुरक्षितही आहे. तसेच या कारमध्ये जबरदस्त फिचर्सही देण्यात आले आहेत. सुरक्षिततेसाठी या कारमध्ये 7 एअरबॅग्स देण्यात आल्या आहेत.

या वाहनांना टक्कर देणार

XUV300 भारतीय मार्केटमध्ये किआ सोनेट, निसान मॅग्नाइट, टोयोटा अर्बन क्रुझर, मारुती विटारा ब्रेझा, फोर्ड ईकोस्पोर्ट, ह्युंदाय वेन्यू आणि टाटा नेक्सॉन या गाड्यांना टक्कर देणार आहे.

हेही वाचा

स्क्रॅपेज पोलिसी लागू झाल्यानंतर 20 वर्ष जुन्या कार भंगारात जाणार? जाणून घ्या तुमच्याकडील पर्याय

15 वर्षांहून जुनी वाहनं 1 एप्रिलपासून थेट भंगारात; नितीन गडकरींची महत्त्वाच्या धोरणाला मंजुरी

वाहन स्क्रॅपेज धोरण लागू झाल्यावर 50000 हजार नोकऱ्या मिळणार; एक कोटी गाड्या रिजेक्ट होणार

Citroen C5 एयरक्रॉस लाँचिंगसाठी सज्ज, फिचर्सच्या बाबतीत बड्या कंपनीच्या SUVs ना मागे टाकणार?

(2021 Mahindra XUV300 launched with AutoSHIFT transmission, connected car tech)

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI