AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Citroen C5 एयरक्रॉस लाँचिंगसाठी सज्ज, फिचर्सच्या बाबतीत बड्या कंपनीच्या SUVs ना मागे टाकणार?

Citroen भारताच्या डोमेस्टिक मार्केटमध्ये जोरदार मुसंडी मारण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी आता त्यांचं पहिलंच प्रोडक्ट (उत्पादन) C5 एयरक्रॉस प्रीमियम SUV लवकरच लाँच करणार आहे.

Citroen C5 एयरक्रॉस लाँचिंगसाठी सज्ज, फिचर्सच्या बाबतीत बड्या कंपनीच्या SUVs ना मागे टाकणार?
| Updated on: Feb 02, 2021 | 5:09 PM
Share

मुंबई : Citroen भारताच्या डोमेस्टिक मार्केटमध्ये जोरदार मुसंडी मारण्यासाठी सज्ज झाली आहे. कंपनी आता त्यांचं पहिलंच प्रोडक्ट (उत्पादन) C5 एयरक्रॉस प्रीमियम SUV लवकरच लाँच करणार आहे. ही फ्रेंच मॅन्युफॅक्चरर भारतात ह्युंदाय Tucson या कारला जोरदार टक्कर देणार आहे. हा ब्रँड गेल्या वर्षीच भारतात डेब्यू करणार होता, परंतु कोरोना महामारीमुळे त्यांनी त्यांचा प्लॅन पुढे ढकलला. दरम्यान, या नव्या उत्पादनाच्या प्रोडक्शनचा पहिला लॉट तामिळनाडूमधील प्लाँटमध्ये तयार करण्यात आला आहे. (Citroen C5 Aircross Revealed In India, Launch Next Month)

या गाडीमधील फिचर्सबाबत बोलायचे झाल्यास या कारमध्ये तुम्हाला 8 इंचांची टचस्क्रीन इन्फोटेन्मेंट सिस्टिम मिळेल जी अॅपल कारप्ले, एंड्रॉयड ऑटो आणि फोन मिर्रिंग कंपॅटिबिलिटीसह येते. यामध्ये तुम्हाला लेदर सीट्स, डुअल टोन डॅशबोर्ड फिनिश, वर्टिकली प्लेस्ड एयर कंडिशनिंग वेंट्स, पॅनोरमिक सनरूफ आणि फ्रंट विंडो ग्लास मिळतील.

ग्राहकांना या कारमध्ये 12.3 इंचांचा डिजिटल इंस्ट्रूमेंट क्लस्टर, इंजन स्टार/ स्टॉप बटण, हिल होल्ड असिस्ट, रिक्लायनिंग मॉड्यूलर रियर सीट्स, ग्रिप कंट्रोल सिस्टिम, ब्लाइंड स्पॉट मॉनिटरिंग, पार्क असिस्ट, फुट ऑपरेटेड इलेक्ट्रिक टेलगेट, ऑटोमॅटिक क्लायमेंट कंट्रोल, एंबियंट लायटिंग, डुअल टोन 18 इंच डायमंड कट अलॉय व्हील्स आणि मल्टी फंक्शनल स्टियरिंग व्हील मिळतील.

या कारमध्ये 2.0 लीटरचं फोर सिलेंडर डिझेल इंजिन मिळेल जे 177 PS आणि 400 Nm पीक टॉर्क देईल. या कारच्या अॅव्हरेजबाबत (मायलेज) बोलायचे झाल्यास यामध्ये तुम्हाला 18.6 किमी प्रति लीटर अॅव्हरेज दिलं जाईल. या गाडीची किंमत 30 लाख रुपयांच्या आसपास असेल.

दमदार फीचर्ससह भारतात 2021 Jeep Compass लॉन्च

जीप इंडियाने भारतात 2021 Jeep Compass Facelift ला लॉन्च केलं आहे (New 2021 Jeep Compass Facelift Launched). या शानदार SUV ची किंमत 16.99 लाख रुपयांपासून सुरु होते आणि 28.29 लाख रुपयांपर्यंत आहे. 2017 मध्ये सुरुवात केल्यानंतर जीप कम्पास भारत कंपनीसाठी एक मुख्य आधार राहिला आहे. भारत 2021 जीप कम्पासाठी ग्लोबल स्तरावर दुसरा बाजार आहे (New 2021 Jeep Compass Facelift Launched).

jeep-compass

2021 मॉडेलच्या डॅशबोर्डची डिझाईन पूर्णपणे नवीन आहे आणि यामध्ये 10.1 इंचाची टचस्क्रीनसोबत अॅपल कारप्ले आणि अँड्रॉईड ऑटोसोबत नवीन UConnect 5 सिस्टम मिळते. दुसरी विशेषता म्हणजे व्हेटिंलेटेड सीट्स, वायरलेस चार्जिंग, फुल डिजीटल इंस्ट्रूमेंट कंसोल आणि एक नवीन 360-डिग्री पार्किंग कॅमराही आहे. जीप ने इन-कार कंट्रोलसाठी नवीन नॉब आणि बटणसोबत प्रिमिअम सॉफ्ट-टच मटेरिअलचा वापर केला आहे.

गाडीमधील दमदार फीचर्स

फीचर्सच्या बाबतील अपडेटेड कम्पासमध्ये स्टिअरिंग व्हिलवर देण्यात आलेल्या बटन्सच्या मदतीने तुम्ही सहज स्क्रीनपर्यंत पोहोचू शकता. विशेष म्हणजे, एफसीए इंडियाच्या नुसार, सर्व प्रवासी 20 इंचापेक्षा जास्त डिजीटल स्क्रीन स्पेसचा आनंद घेऊ शकतात. सुरक्षेच्या दृष्टीने यामध्ये तुम्हाला इलेक्ट्रॉनिक पार्किंग ब्रेक, हिल होल्ड आणि हिल डिसेंट कंट्रोल, सेलेकटरेन 4×4 सिस्टम, 6 अयरबॅग, पॅनिक ब्रेक असिस्ट, ब्रेक सपोर्ट सारख्या 50 पेक्षा जास्त सुविधा आहेत.

हेही वाचा

स्क्रॅपेज पोलिसी लागू झाल्यानंतर 20 वर्ष जुन्या कार भंगारात जाणार? जाणून घ्या तुमच्याकडील पर्याय

15 वर्षांहून जुनी वाहनं 1 एप्रिलपासून थेट भंगारात; नितीन गडकरींची महत्त्वाच्या धोरणाला मंजुरी

Vehicles scrapping Budget 2021: जुन्या वाहनांसाठी बजेटमध्ये मोठी घोषणा, 5 वर्ष जास्त काळ चालवू शकाल गाडी

Budget 2021 : भारत 5 वर्षात ऑटोमोबाईल मॅन्युफॅक्चरिंग हब बनेल; गडकरींकडून वाहन स्क्रॅप धोरणाचं कौतुक

वाहन स्क्रॅपेज धोरण लागू झाल्यावर 50000 हजार नोकऱ्या मिळणार; एक कोटी गाड्या रिजेक्ट होणार

(Citroen C5 Aircross Revealed In India, Launch Next Month)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.