दुष्काळात तेरावा, खतांच्या किंमतीत भरघोस वाढ

सततच्या दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकरी संकटात आहे. त्यात आता रासायनिक खतांच्या किमतीत वाढ करण्यात आली आहे.

दुष्काळात तेरावा, खतांच्या किंमतीत भरघोस वाढ
| Updated on: Jun 13, 2019 | 3:59 PM

नागपूर : सततच्या दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकरी दुहेरी संकटात सापडले आहे. त्यात आता रासायनिक खतांच्या किमतीत भरघोस वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे दुष्काळामुळे हैराण झालेल्या शेतकऱ्यांना खतांच्या किंमती वाढल्याने त्यात पुन्हा भर पडली आहे. यंदाच्या खरीप हंगामात रासायनिक खतांच्या किंमती 15 ते 20 टक्के वाढल्या आहेत. म्हणजेच खताच्या एका बॅगमागे 280 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. याचा मोठा फटका दुष्काळाचा मार सहन करत असलेल्या शेतकऱ्यांना बसणार आहे.

दुष्काळाचा मार सहन करणाऱ्या शेतकऱ्यांवर हे नवे संकट ओढवले आहे. रासायनिक खतांच्या किंमती वाढल्याने शेतकऱ्यांचे खरीपाचं बजेट पूर्णपणे कोलमडले आहे. नुकतंच रासायनिक खतांच्या किंमतीत 15 ते 20 टक्के म्हणजे एक बॅगमागे 280 रुपयांपर्यंत वाढ झाली आहे. रासायनिक खतांच्या किंमतीत वाढ झाल्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढणार आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात खतांच्या किंमती वाढल्याने खतांची दरवाढ करण्यात आल्याचे व्यापाऱ्यांनी सांगितले.

किती रुपयांनी खरीप खतांच्या किंमतीत वाढ

खतं                      वाढलेली किंमत         सध्याचे दर

(प्रति बॅग)                 (प्रति बॅग)

10:36:26                243 रु.                   1450 रु.

10:20:0:13            165 रु.                   1125 रु.

12:32:16                225 रु.                  1240 रु.

डीएपी                    190 रु.                   1440 रु.

एमओपी                280 रु.                   950 रु.

24:24:0               140 रु.                   1340 रु.

खतांच्या किंमतीच्या दरवाढीचा फटका शेतकऱ्यांना बसतो आहे. यामुळे यंदाच्या खरीपात शेतीचा लागवड खर्चही वाढणार आहे.

दुष्काळामुळे राज्यातला शेतकरी जगण्यासाठी संघर्ष करत आहे. त्यात आता खरीप पेरणी करायची तयारी शेतकऱ्यांनी केली आहे. मात्र त्यातही आता खतांच्या दरवाढीचं नवं संकट ओढावलं आहे. खतांच्या किंमती वाढल्याने शेतीचा उत्पादन खर्च वाढणार आहे. पण जर शेतमालाचे दर वाढले नाही, तर पुन्हा शेतकरी मरणाच्या दारात उभा ठाकल्याशिवाय राहणार नाही.