PHOTO : मुख्यमंत्र्यांच्या हेलिकॉप्टरसोबत नेमकं काय घडलं?

| Updated on: Oct 11, 2019 | 7:37 PM

1 / 7
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (CM Devendra Fadanvis helicopter) यांच्यामागे हेलिकॉप्टरची ससेमिरा कायम आहे. मुख्यमंत्र्यांचं हेलिकॉप्टर रायगडमधील हेलिपॅडवरील चिखलात रुतलं.

2 / 7
मुख्यमंत्री अहमदनगर जिल्ह्यातील कर्जतहून हेलिकॉप्टरने (CM Devendra Fadanvis helicopter)  रायगडमध्ये आले. हेलिकॉप्टर पेण-बोरगाव येथे उतरताना हेलिपॅडवरील मातीत हेलिकॉप्टरची चाके रुतली.

3 / 7
मुख्यमंत्र्यांचं चार्टर्ड हेलिकॉप्टर आहे. रायगड जिल्ह्यातील दुसरी घटना आहे. मुख्यमंत्री अलिबागला आले होते त्यावेळीही त्यांच्या हेलिकॉप्टरला छोटीशी दुर्घटना झाली होती.

4 / 7
दरम्यान, भाजपनेही यावर स्पष्टीकरण दिलं आहे.

5 / 7
पेण येथे लँडिंग करताना मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस थोडक्यात बचावले, अशा आशयाच्या बातम्या दाखविल्या जात आहेत. वस्तुत:  कोणताही अनुचित प्रकार घडलेला नाही, असं भाजप प्रवक्ते केशव उपाध्ये यांनी म्हटलंय.

6 / 7
लँडिंग करताना पायलट काळजी घेऊनच लँड करत असतात. मुख्यमंत्री आपल्या सर्व नियोजित सभा पूर्ण करीत आहेत. त्याच हेलिकॉप्टरने मुख्यमंत्री उल्हासनगर येथे रवाना झाले आणि तेथील सभाही त्यांनी केली. त्यामुळे कोणत्याही प्रकारच्या अफवेवर, चुकीच्या माहितीवर कुणीही विश्वास ठेऊ नये, असं आवाहनही उपाध्ये यांनी केलं.

7 / 7