AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Chanakya Niti: चाणक्य म्हणतात पुरुषांना हे नियम माहिती असावेतच, कधीच पत्नीसोबत भांडणं होणार नाहीत

आर्य चाणक्य यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला, या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी अनेक विषयांवर लिहीलं आहे. पती-पत्नीचं नातं कसं असावं? हे सांगताना चाणक्य म्हणतात असे काही नियम आहेत, जे पुरुषांना माहिती असावेतच, चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य नीतीमध्ये नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

Chanakya Niti:  चाणक्य म्हणतात पुरुषांना हे नियम माहिती असावेतच, कधीच पत्नीसोबत भांडणं होणार नाहीत
chanakya Image Credit source: टीव्ही 9 मराठी
| Updated on: Feb 23, 2026 | 8:43 PM
Share

आर्य चाणक्य हे एक महान विचारवंत, अर्थतज्ज्ञ आणि कुटनीतीतज्ज्ञ होते. त्यांनी चाणक्य नीती नावाचा ग्रंथ लिहिला. या ग्रंथामध्ये चाणक्य यांनी मानवी जीवनाच्या प्रत्येक पैलूंवर लिखाण केलं आहे. चाणक्य यांनी पती-पत्नीचं नातं कसं असावं? आदर्श पती कसा असावा? आदर्श पत्नी कशी असावी? याबाबत आपल्या चाणक्य नीती नावाच्या ग्रंथामध्ये अनेक गोष्टी सांगितल्या आहेत. चाणक्य म्हणतात पती -पत्नीचं नातं हे विश्वासावर टिकलेलं असतं, या विश्वासाला थोडा जरी तडा गेला तरी हे नातं फार काळ टिकेलच असं सांगता येत नाही. चाणक्य पुढे असंही म्हणतात पती पत्नी हे संसाराची दोन चाकं आहेत, त्यामुळे त्यांनी समान गतीनं चाललं पाहिजे. अशा काही गोष्टी आहेत, नियम आहेत, जे पुरुषांना माहिती हवेतच, त्यानंतर तुमचे आपल्या पत्नीशी कधीही भांडणं होणार नाही, असं चाणक्य यांनी म्हटलं आहे. चला तर मग जाणून घेऊयात चाणक्य यांनी नेमकं काय म्हटलं आहे? त्याबद्दल.

पत्नीवर प्रेम व्यक्त करा – चाणक्य म्हणतात पतीने जेव्हा पण संधी मिळेल त्यावेळी पत्नीवर प्रेम व्यक्त केलं पाहिजे, यामुळे संसारातील गोडवा वाढतो. अनेक पुरुष असे असतात की ज्यांचं त्यांच्या पत्नीवर खूप प्रेम असतं, परंतु त्यांना ते आपल्या आयुष्यात कधीही व्यक्त करता येत नाही, अशावेळी पत्नीच्या मनात तुमच्या विषयी संशय निर्माण होऊ शकतो, त्यामुळे पत्नीवरचं आपलं प्रेम व्यक्त करणं गरजेचं असतं.

हक्क सांगा – चाणक्य म्हणतात पती-पत्नीने कधीही एकमेकांवर आपला हक्क सांगण्यास लाजू नये, यामुळे पती-पत्नीमधील प्रेम अधिक वाढतं, नातं घट्ट होतं. संसार दीर्घकाळ टिकतो. पत्नी-पत्नीच्या नात्यात गोडवा आणि आनंद निर्माण होतो, त्यामुळे कधी-कधी हक्क देखील व्यक्त करा असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

कमकुवतपणा उघड करू नका – चाणक्य म्हणतात आपल्या पत्नीसमोर कधीही तुमचा कमकुवतपणा उघड करू नका, जेव्हा तुम्ही पत्नीला तुमच्या कमकुवतपणाबद्दल सांगता, तेव्हा ती तुमच्या प्रतिष्ठेवर प्रश्नचिन्ह उपस्थित करू शकते, अशावेळी तुमचा आत्मविश्वास कमी होऊ शकतो.

जुनं प्रेम प्रकरण – चाणक्य म्हणतात आपल्या पत्नीला आपल्या जुन्या प्रेमप्रकरणाबद्दल कधीही सागू नका, कारण त्यामुळे तुमच्याबद्दल तुमच्या पत्नीच्या मनात कायम संशय राहू शकतो.

प्रामाणिकपणा –चाणक्य म्हणतात पती-पत्नीने कायम एकमेकांसोबत प्रामाणिक असं पाहिजे. तर आणि तरच संसार टिकतो, असा सल्ला चाणक्य यांनी दिला आहे.

(डिस्क्लेमर : वरील माहिती उपलब्ध स्रोतावरून देण्यात आलेली आहे. याच्या तथ्यांबद्दल आम्ही कुठलाही दावा करीत नाही, तसेच अंधश्रद्धेला दुजोरा देत नाही)

Follow Us
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातीला आणवणींना...
मानेवाडीच्या मैदानावर रंगली भन्नाट बैलगाडा शर्यत; गावातील आठणवणींना उजाळा देणारा जबरदस्त व्हिडीओ
नुसती धावपळ...धुराचा कल्लोळ...आयकर विभागाच्या कार्यालयाला भीषण आग!
नुसती धावपळ... धुराचा लोट...आयकर विभागाच्या कार्यालयाला आग! अग्निशमनच्या 8 गाड्या घटनास्थळी दाखल
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये
उज्जैनच्या नागचंद्रेश्वर मंदिरात मोठा गोंधळ! त्या अफवेने भाविकांमध्ये धवपळ, 13 हुन अधिक...
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर
गोल्डन नेस्टजवळ मेट्रोचा स्लॅब कोसळल्याने सुरक्षेचा प्रश्न ऐरणीवर; मोठी दुर्घटना टळली
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
मनोज जरांगे पाटील यांची २९ ऑगस्टपासून पुन्हा आमरण उपोषणाची घोषणा
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं विधान...
तर तुमच्या मागे रेडा लावणार', गिरीश महाजनांबाबत राऊतांचं अगदी जिव्हारी लागणारं वक्तव्य
राज्याच्या विकासासाठी मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट
मुख्यमंत्री फडणवीसांनी घेतली पंतप्रधानांची भेट: राज्याच्या विकासासाठी मागितले सहकार्य
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव...
रायगडला नवा पालकमंत्री, गोगावलेंच्या निवडीने माणगावात आनंदोत्सव
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गणेशोत्सवासाठी रस्ते दुरुस्तीचा घेणार आढावा
पालकमंत्रीपदाचा तिढा सुटला,पालकमंत्रीपदी गोगावले, महाजन यांची नियुक्ती
रायगडच्या पालकमंत्रीपदी भरत गोगावले, नाशिकच्या पालकमंत्रीपदी गिरीश महाजन