नागपूरचे स्वच्छ शहराचे रँकिंग घसरले, 18 वरून 23 व्या स्थानावर घरसगुंडी

देशभरातील प्रमुख शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. नागपूर शहरात केंद्रीय पथकाने स्वच्छतेची पाहणी केल्यानंतर शनिवारी निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धा ही एकूण 6,000 गुणांची होती. त्यात तीन कॅटेगिरीसाठी वेगवेगळे गुण निश्‍चित करण्यात आले होते.

नागपूरचे स्वच्छ शहराचे रँकिंग घसरले, 18 वरून 23 व्या स्थानावर घरसगुंडी
| Edited By: | Updated on: Nov 21, 2021 | 12:54 PM

नागपूर : स्वच्छता अभियान स्पर्धेचा निकाल जाहीर करण्यात आला. या स्पर्धेत नागपूर शहराच्या क्रमांकात घसरण झाली आहे. आधी नागपूर टॉप 20 मध्ये 18 स्थानावर होते. आता शहर 23 व्या क्रमांकावर फेकले गेले आहे. केंद्र शासनाच्या नगरविकास मंत्रालयातर्फे ही स्पर्धा घेण्यात आली होती.

देशभरातील प्रमुख शहरांमध्ये स्वच्छता सर्वेक्षण करण्यात आले. नागपूर शहरात केंद्रीय पथकाने स्वच्छतेची पाहणी केल्यानंतर शनिवारी निकाल जाहीर करण्यात आला. स्पर्धा ही एकूण 6,000 गुणांची होती. त्यात तीन कॅटेगिरीसाठी वेगवेगळे गुण निश्‍चित करण्यात आले होते.

स्पर्धेत 48 शहरांचा समावेश

यात सिटीझन फिडबॅकवर 1800 गुण, सर्व्हिस लेवल प्रोग्राम 2400 गुण निश्‍चित करण्यात आले. सर्टिफिकेशनवर 1800 गुण होते. या स्पर्धेत शहराला एकूण 3721.82 गुण मिळाले. त्यानुसार शहरातील रॅकिंग ही 23 वर आहे. दहा लाख लोकसंख्येच्या प्रमुख शहरात ही स्पर्धा होती. स्पर्धेत 48 शहरांचा समावेश होता. मागील वर्षी मिळालेल्या एकूण गुणाची टक्केवारी ही 72.4 टक्के होती तर यावर्षी यात 10 टक्क्यांनी घसरण होत शहराचा एकूण स्कोअर 62.0३ टक्के आहे. दरम्यान, नागपूर शहर हे टॉप 20 वरून टॉप 10 मध्ये प्रवेश करेल, असे दावे केले जात होते. परंतु, आता शहर होत्या त्या क्रमांकावरूनही माघारल्यानंतर महापालिकेच्या एकूणच कामगिरीवर प्रश्नचिन्ह उपस्थित करणारी ही बाब आहे.

सलग पाचव्या वर्षी इंदूर स्वच्छ शहर

मध्यप्रदेशातल्या इंदूर या शहराने सलग पाचव्या वर्षी देशातील सर्वात स्वच्छ शहर बनण्याचा मान मिळविला आहे. शनिवारी नवी दिल्लीत झालेल्या सोहळ्यात राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या हस्ते स्वच्छ सर्वेक्षण 2021 मधल्या विजेत्या शहरांचा गौरव करण्यात आला.आता आणि मागील वर्षी सर्टिफिकेशन केवळ 500 गुण मिळाले. वर्षभरात यात कुठलेही काम झाले नाही. शहराचा क्रमांक उंचावण्याकरिता घनकचरा व्यवस्थापन प्लांट महत्त्वाचा आहे. स्पध्रेच्या एकूण गुणांकाच्या 40 टक्के गुण हे त्यावरच आधारित आहे. शहर कचरामुक्त शहर (गार्बेज फ्री सिटी) मध्ये गुण मिळू शकले नाही, अशी माहिती ग्रीन व्हिजील फाउंडेशनचे संस्थापक कौस्तुभ चॅटर्जी यांनी दिली.

महाराष्ट्रालाही दोन वर्षापूर्वी स्वातंत्र्य मिळालं, आम्ही करेक्ट कार्यक्रम करून दाखवला; संजय राऊतांची जोरदार टोलेबाजी

पुढे-मागे फौजफाटा असूनही बसची अखेर तोडफोड, औरंगाबादच्या पैठण आगारात पुन्हा रवानगी!