कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव बदला, उद्धव ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी

| Updated on: Dec 07, 2019 | 8:10 PM

कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्यात यावा. अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना केली (kolhapur shivaji university name expansion) आहे.

कोल्हापूरच्या शिवाजी विद्यापीठाचे नाव बदला, उद्धव ठाकरेंची राज्यपालांकडे मागणी
Follow us on

मुंबई : कोल्हापुरातील शिवाजी विद्यापीठाचा नामविस्तार “छत्रपती शिवाजी महाराज विद्यापीठ” असा करण्यात यावा. तसेच याबाबतची कायदेशीर प्रक्रिया त्वरित सुरु करावी, अशी मागणी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्यपाल भगत सिंग कोश्यारी यांना केली (kolhapur shivaji university name expansion) आहे.

छत्रपती शिवाजी महाराज हे महाराष्ट्राचे आराध्य दैवत असून त्यांचा योग्य तो सन्मान राखणे गरजेचे आहे. त्यांचे कर्तृत्व केवळ महाराष्ट्रापुरते मर्यादित नसून सर्व भारतीयांच्या मनात त्यांच्याविषयी आदराची भावना आहे. म्हणून त्यांचा एकेरी उल्लेख टाळण्यासाठी हा बदल करण्याचे मुख्यमंत्र्यांनी सुचविले आहे. यापूर्वी मुंबई येथील आंतरराष्ट्रीय विमानतळ आणि रेल्वे स्थानकाच्या नावात देखील छत्रपती शिवाजी महाराज असा संपूर्ण उल्लेख करण्यात आला (kolhapur shivaji university name expansion) आहे.

त्यानुसार केवळ शिवाजी महाराजच नव्हे तर राज्याच्या सर्व आदरणीय महापुरुष आणि दैवतांच्या नावाने असणाऱ्या शासकीय योजना, कार्यक्रम, ठिकाणे यांचा नामविस्तार करून त्यांच्या संपूर्ण नावाचा उल्लेख करुन बदल करावा असे मतही मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केले (kolhapur shivaji university name expansion) आहे.

तसेच केवळ जोतिबा फुले असे न म्हणता महात्मा जोतिराव फुले, संभाजी ऐवजी छत्रपती संभाजी महाराज असे नामविस्तार करावा. या महापुरुषांचा योग्य तो गौरव करावा, या दृष्टीने संबंधित विभागांनी कार्यवाही सुरु करावी असे आदेशही मुख्यमंत्र्यांनी दिले आहेत.