VIDEO : ‘मैं दिवानी हो गई’, अमृता फडणवीस यांचा डान्स व्हायरल

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा या ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमातील ‘मैं दिवानी हो गई’ या गाण्यावर थिरकताना दिसल्या. ‘मिसेस मुख्यमंत्री’ अमृता फडणवीस यांना आतापर्यंत आपण गायन आणि अभिनय करताना पाहिले आहे, मात्र आता त्या नृत्यकलेतही पारंगत असल्याचे दिसून आले. एका कौटुंबिक संगीत कार्यक्रमात अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा […]

VIDEO : मैं दिवानी हो गई, अमृता फडणवीस यांचा डान्स व्हायरल
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 4:46 PM

मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा या ‘बाजीराव मस्तानी’ सिनेमातील ‘मैं दिवानी हो गई’ या गाण्यावर थिरकताना दिसल्या. ‘मिसेस मुख्यमंत्री’ अमृता फडणवीस यांना आतापर्यंत आपण गायन आणि अभिनय करताना पाहिले आहे, मात्र आता त्या नृत्यकलेतही पारंगत असल्याचे दिसून आले. एका कौटुंबिक संगीत कार्यक्रमात अमृता फडणवीस आणि मुलगी दिविजा यांनी डान्स केला.

अमृता फडणवीस यांनी स्वत: फेसबुक पेजवरुन या डान्सचा व्हिडीओ शेअर केला असून, कौटुंबिक सोहळ्यातील संगीत कार्यक्रमात डान्स केल्याचेही त्यांनी कॅप्शनमध्ये सांगतिले आहे.

माझ्या लाडक्या मुलीसोबत कौटुंबिक संगीत सोहळ्यात डान्स करायला मिळालं, याचं प्रचंड आनंद आहे, असे अमृता फडणवीस यांनी म्हटले आहे.

49 सेकंदांचा हा अमृता फडणवीस आणि दिविजाच्या डान्सचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर तुफान पाहिला जातो आहे. आतापर्यंत 20 हजारहून अधिक व्हूज या व्हिडीओला मिळाले असून, शेअर्सही मोठ्या प्रमाणात होतो आहे.

अमृता फडणवीस आणि दिविजा डान्स करत असताना, उपस्थितांची दादही मिळताना ऐकायला येत आहे.

पाहा व्हिडीओ :