भाजपमधील सामूहिक नेतृत्त्व संपलंय, आता एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात- खडसे

| Updated on: Oct 22, 2020 | 11:07 AM

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत | Eknath Khadse

भाजपमधील सामूहिक नेतृत्त्व संपलंय, आता एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात- खडसे
भोसरी भूखंड प्रकरणाच्या चौकशीसाठी स्थापन केलेल्या एकसदस्यीय कमिटीचे अध्यक्ष न्यायाधीश डी. एस .झोटिंग यांचे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सहकार्य घ्यावे, अशी सूचनाही दमानिया यांनी मांडली.
Follow us on

जळगाव: भाजपमध्ये पूर्वी अस्तित्वात असलेली सामूहिक नेतृत्त्वाची परंपरा संपुष्टात आली आहे. आता पक्षात केवळ एकाधिकारशाहीने निर्णय घेतले जातात, अशी टीका एकनाथ खडसे यांनी केली. पूर्वीच्या कालखंडातील आमचे नेते सामूहिक नेतृत्त्वाच्या अनुषंगाने काम करायचे. सर्वांशी सल्लामसलत करुन निर्णय व्हायचा. पण अलीकडच्या काळात भाजप व्यक्तीकेंद्रित झाली आहे. एकाच व्यक्तीने निर्णय घ्यावा आणि त्याची अंमलबजावणी करावी, असा कारभार सुरु आहे. निर्णय आधीच ठरलेला असतो, फक्त नावापुरते विचारले जाते, असे एकनाथ खडसे यांनी म्हटले. (Eknath Khadse criticize Devendra Fadnavis)

एकनाथ खडसे यांनी शुक्रवारी मुंबईतील कार्यक्रमात राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. थोड्याचवेळात ते मुक्ताईनगरमधून मुंबईच्या दिशेने रवाना होतील. त्यापूर्वी एकनाथ खडसे यांनी ‘टीव्ही 9 मराठी’शी एक्स्लुझिव्ह संवाद साधला. देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यपद्धतीवर पक्षातील अनेक नेते नाराज आहेत. परंतु, हे नेते समोर येऊन बोलत नाहीत. एवढेच काय भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील हेदेखील देवेंद्र फडणवीस यांना विचारल्याशिवाय कोणताही निर्णय घेऊ शकत नाहीत, असा दावा खडसे यांनी केला.

भाजप स्थापन झाल्यापासून पक्षाचे काम एकनिष्ठेने आणि प्रामाणिकपणे केले. त्या कालखंडात परिस्थिती फार अवघड होती. आणीबाणीनंतर भारतीय जनता पार्टीची जेव्हा सुरुवात झाली तेव्हा ती जनमानसात रुजलेली नव्हती. कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी नव्हते. त्यावेळी गावागावांत उपेक्षा सहन करावी लागायची. पण सर्वांच्या मेहनतीने भाजपला आज अच्छे दिवस आले. याचा मला नेहमी आनंद राहील, असे खडसे यांनी सांगितले.

10 आमदार माझ्या संपर्कात, खडसेंचा दावा; भाजपमध्ये लवकरच मोठा राजकीय भूकंप होणार?
माझ्यासोबत उद्या भाजपचे 15-16 माजी आमदार राष्ट्रवादीत प्रवेश करणार असून भाजपमधील 10-12 आमदार माझ्या संपर्कात आहेत, असा दावा भाजपचे बंडखोर नेते एकनाथ खडसे यांनी केला आहे. त्यामुळे आगामी काळात भाजपमध्ये मोठा राजकीय भूकंप होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

‘2019च्या विधानसभा निवडणुकीवेळी माझ्याकडे राष्ट्रवादी काँग्रेसचा एबी फॉर्म होता’

‘विधानसभा निवडणुकीवेळी जेव्हा मला तिकीट नाकारण्यात आलं तेव्हा राष्ट्रवादीचा एबी फॉर्म माझ्याकडे रेडी होता. मी तेव्हाच पक्ष सोडून निवडून आलो असतो’ असा मोठा गौप्यस्फोट ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केला. ‘निवडणुकांवेळी माझ्याकडे एबी फॉर्म तयार होता. राष्ट्रवादीतून मी निवडून आलो असतो. त्यावेळी अजित पवार, दिलीप वळसे पाटील यांनी मला फोन केले होते. मी तेव्हाच जिंकलो असतो’, असे खडसे यांनी सांगितले.

 

संबंधित बातम्या:

Special Report | एकनाथ खडसे राष्ट्रवादीत, उत्तर महाराष्ट्रातील राजकारणावर काय परिणाम?

एकनाथ खडसेंना पश्चाताप होईल, खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया

…आणि मुक्ताईनगरच्या कार्यालयावर 40 वर्षांपासून असलेली भाजपची ओळख एका रात्रीत नाहिशी

(Eknath Khadse criticize Devendra Fadnavis)