AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

एकनाथ खडसेंना पश्चाताप होईल, खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया

एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, उजेडात होईल, खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादीला फायदा होईल, असं जयंत पाटील म्हणाले

एकनाथ खडसेंना पश्चाताप होईल, खडसेंच्या राजीनाम्यानंतर भाजपची पहिली प्रतिक्रिया
Anish Bendre
Anish Bendre | Edited By: | Updated on: Jan 15, 2021 | 7:59 PM
Share

मुंबई : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी अखेर पक्षाला रामराम ठोकला. राष्ट्रवादीचे अध्यक्ष जयंत पाटील यांनी खडसेंच्या राजीनाम्याची अधिकृत बातमी जाहीर केली. भाजप उपाध्यक्ष राम शिंदे यांची प्रतिक्रिया समोर आली आहे. एकनाथ खडसेंना पक्ष सोडल्याचा पश्चाताप होईल, असं राम शिंदे म्हणाले. (BJP reaction after Eknath Khadse resigns from party to join NCP)

एकनाथ खडसे यांना जी किंमत भारतीय जनता पक्षात मिळत होती, ती राष्ट्रवादीत मिळणार नाही. त्यांच्याबरोबर असा कोणताही नेता राष्ट्रवादीत जाणार नाही, असा विश्वास राम शिंदे यांनी व्यक्त केला. नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली देशात भारतीय जनता पक्षाचा विस्तार होताना दिसत आहे. एकनाथ खडसे यांनी जी हिंमत केली, त्याचा पश्चाताप झाल्याशिवाय राहणार नाही, असंही राम शिंदे म्हणाले.

दरम्यान, खडसेंच्या राजीनाम्याची अधिकृत माहिती नाही. अधिकृतरित्या राजीनीमा दिल्याच कळल्यावर यावर बोलेन, आमचे अध्यक्ष हे आधीच खडसेंसोबत बोलत आहेत तेच याबद्द्ल सांगू शकतील, असं उत्तर विरोधीपक्ष नेते देवेंद्र फडणवीस यांनी दिलं. एकनाथ खडसेंना थांबवणार का, या प्रश्नावर फडणवीसांनी प्रतिक्रिया दिली.

एकनाथ खडसे यांचं महाविकास आघाडीत स्वागतच : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

उस्मानाबाद: एकनाथ खडसे यांनी भाजपला रामराम ठोकल्यानंतर शुक्रवारी त्यांचा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश होणार असल्याची अधिकृत घोषणा प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी केली आहे. त्यावर एकनाथ खडसे महाविकास आघाडीत येत असतील तर त्यांचं स्वागतच आहे अशी प्रतिक्रिया मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली आहे.

जयंत पाटलांकडून खडसेंच्या प्रवेशाची घोषणा

राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी पत्रकार परिषद घेऊन, भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या अधिकृत प्रवेशाची घोषणा केली. “गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत”, असं जयंत पाटील म्हणाले.

एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, उजेडात होईल, खडसे हे ज्येष्ठ नेते आहेत. त्यांच्या अनुभवाचा राष्ट्रवादी काँग्रेसला निश्चितच फायदा होईल, असं जयंत पाटील यांनी सांगितलं.

खडसेंनी भाजपचा त्याग केल्याने शुक्रवारी दुपारी दोन वाजता एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करतील. त्यामुळे राष्ट्रवादीचं बळ वाढेल. एक अनेक वर्षांचा अनुभवी नेता अनेक प्रश्नांशी मुद्द्यांवर काम करुन, महाराष्ट्राची जाण असणार नेता राष्ट्रवादीत येत आहे. त्यांचं स्वागतं, असं जयंत पाटील यांनी नमूद केलं.

जयंत पाटील नेमकं काय म्हणाले?

गेले तीन दशकं भाजपचे नेतृत्व करणारे, उत्तर महाराष्ट्रात गोपीनाथ मुंडेंसह काम करणाऱ्या एकनाथ खडसे यांनी पक्ष सोडल्याचं सांगितलं, शुक्रवारी दुपारी 2 वाजता खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार आहेत.

महाराष्ट्राच्या विविध प्रश्नांची जाण असलेला नेता राष्ट्रवादीत येत आहे, त्यांचं स्वागत, सध्या प्रवेशाची बातमी, त्यांना कोणतं पद मिळणार हे योग्य वेळी समजेल

भाजपमध्ये एकनाथ खडसेंवर होणारा त्रास सर्वांनी पाहिला आहे, त्यामुळे त्यांनी पक्षाचा त्याग केला, आणखी कोण येणार, याचा उलगडा हळूहळू होईल

एकनाथ खडसेंसोबत येण्याची अनेक जणांची इच्छा, मात्र कोरोना काळात विधानसभा निवडणूक घेणे शक्य नाही, त्यामुळे हळूहळू सर्वांचे प्रवेश होतील, अनेक जण त्यांच्या संपर्कात

एकनाथ खडसेंना आम्ही प्रवेश दिला आहे, भाजपकडून हिरमोड झालेले आणि भाजपकडून विकासाची अपेक्षा न उरलेले एकनाथ खडसेंसोबत येतील

विविध भागातील तीन ते चार भाजप नेत्यांशी चर्चा, त्यांचीही राष्ट्रवादीत येण्याची इच्छा, एकनाथ खडसेंचा प्रवेश अंधारात होणार नाही, दिवसाढवळ्याच होईल.

(BJP reaction after Eknath Khadse resigns from party to join NCP)

टीव्ही 9 च्या बातमीवर शिक्कामोर्तब

भाजपचे नाराज नेते एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशावर अखेर शिक्कामोर्तब झालं आहे. याबाबत राष्ट्रवादीचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी अधिकृत घोषणा केली. नाथाभाऊ समर्थक भाजप पदाधिकारी आणि कार्यकर्ते एकनाथ खडसे यांच्या बंगल्यावर जमा झाले आहेत. कार्यकर्त्यांमध्ये खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाची उत्सुकता आहे. मुंबईत राष्ट्रवादीकडून खडसेंच्या प्रवेशाची अधिकृत घोषणा झाली आहे.  राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी  पत्रकार परिषद घेत ही घोषणा केली.

एकनाथ खडसे यांची राजकीय कारकीर्द

1980 मध्ये खडसे यांनी भाजप कार्यकर्त्याच्या रुपात सक्रिय राजकारणात प्रवेश केला. उत्तर महाराष्ट्रात भाजपचा पाया प्रस्थापित करण्यात एकनाथ खडसेंचा मोठा वाटा मानला जातो. लेवा समाजातील असलेल्या खडसेंकडे ओबीसी नेतृत्व म्हणून पाहिले जाते.

एकनाथ खडसे यांनी लढवलेली पहिली निवडणूक कोथडी ग्रामपंचायतीची होती. मात्र पहिल्याच निवडणुकीत खडसेंना पराभवाचा धक्का बसला होता. पुढे, 1987 मध्ये त्याच कोथडी गावाचे ते सरपंच झाले. 1989 मध्ये मुक्ताईनगर मतदारसंघातून ते विधानसभेवर आमदार म्हणून निवडून आले. सलग सहा टर्म (1989 – 2019) म्हणजे तब्बल तीस वर्ष मुक्ताईनगर हा खडसेंचा बालेकिल्ला राहिला.

संबंधित बातम्या 

Eknath Khadse | पहिल्या निवडणुकीत पराभव ते 30 वर्ष मुक्ताईनगरवर अधिराज्य, एकनाथ खडसेंची कारकीर्द

कन्येसह राष्ट्रवादीत जाणार; सून मात्र भाजपमध्येच राहणार; नाथाभाऊंची नवी ‘खेळी’

मोठी बातमी: मोदींकडून भ्रमनिरास झाल्याचे ‘ते’ रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट   

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना?

(BJP reaction after Eknath Khadse resigns from party to join NCP)

Follow Us
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवानाच रद्द केला
Burger King च्या पुणे आउटलेटला मोठा झटका! FDA ने परवाना रद्द केला, नेमकं कारण काय?
काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात
Eknath shinde | काँग्रेसने लोकशाहीचा मुडदा पाडला; राहुल गांधींवर एकनाथ शिंदेंचा घणाघात, 45 सरकारांचा दाखला देत म्हणाले...
शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल
Nagpur Farmer | शेताला साडी नेसवली अन् रानडुकरांना पळवलं! नागपूरच्या शेतकऱ्यांची भन्नाट शक्कल चर्चेत, व्हिडिओ होतोय व्हायरल
राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे...
Rahul Gandhi | राहुल गांधींच्या मिमिक्रीने नवा वाद! मिठ्या मारणं म्हणजे परराष्ट्र धोरण नाही म्हणत मोदींवर निशाणा
शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
तू तेव्हा वाचला आहेस, आता वाचणार नाहीस! शिवसेना तालुकाप्रमुखाला जीवे मारण्याची धमकी? ऑडिओ व्हायरल
केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल
MNS Protest | केळेवाडी ते चर्नी रोड पूल कधी होणार? मनसेचा प्रशासनाला सवाल; आंदोलन पेटलं
हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Ramp Walk | हातात बंदुका, आता रॅम्पवर कॅटवॉक! आत्मसमर्पित महिला नक्षलवाद्यांचा भन्नाट नवा अवतार बघाच
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन....
Jalna Triple S City! मुख्यमंत्री फडणवीसांचा मोठा प्लॅन; रेशीम उद्योगाला मिळणार नवी झेप
राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान
Supriya Sule | राष्ट्रवादी शरद पवारांचीच!; सुप्रिया सुळेंचं मोठं विधान, नेमकं काय म्हणाल्या...
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश
2027 च्या जनगणनेत जात, ओळख आणि कोविड लस संबंधित माहितीचा समावेश