AQI
TV9 Network
User
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

लता मंगेशकर यांचा आवाज म्हणून लोकांनी ऐकलं गाणं, 48 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, ऐकताच मन होते शांत

48 वर्षांपूर्वीच प्रचंड सुंदर गाणं, ज्यामधील आवाज लोकांना वाटला लता मंगेशकर आणि आशा भोसले यांचा. पण तो आवाज निघाला दुसऱ्याच गायिकेचा.

लता मंगेशकर यांचा आवाज म्हणून लोकांनी ऐकलं गाणं, 48 वर्षांपासून प्रचंड सुपरहिट, ऐकताच मन होते शांत
| Updated on: Aug 14, 2026 | 6:55 PM
Share

जुन्या हिंदी चित्रपटातील गाणी ऐकताना लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांचा आवाज कानावर पडतोय असे अनेकदा वाटते. मात्र, या दोन दिग्गज गायिकांव्यतिरिक्तही काही आवाजांनी हिंदी चित्रपटसंगीतात स्वतःची वेगळी ओळख निर्माण केली. असाच एक गोड आणि भावस्पर्शी आवाज म्हणजे गायिका हेमलता यांचा.

1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘अंखियों के झरोखों से’ या चित्रपटाचे शीर्षकगीत आजही जुन्या हिंदी गाण्यांच्या चाहत्यांमध्ये लोकप्रिय आहे. या गाण्याची साधी, मधुर चाल आणि हेमलता यांचा भावूक आवाज ऐकणाऱ्याला जुन्या आठवणींच्या विश्वात घेऊन जातो. विशेष म्हणजे, आजही अनेकांना हे गाणे लता मंगेशकर किंवा आशा भोसले यांनी गायले असावे असे वाटते. मात्र, या लोकप्रिय गाण्याला आवाज दिला होता हेमलता यांनी.

रवींद्र जैन यांच्या संगीताची जादू

‘अंखियों के झरोखों से’ या गाण्याचे बोल आणि संगीत दोन्ही रवींद्र जैन यांनी तयार केले होते. त्यांच्या खास संगीतशैलीसोबत हेमलता यांच्या भावपूर्ण आवाजाचा सुंदर मेळ या गाण्यात ऐकायला मिळतो.

गाण्याची चाल अत्यंत साधी आणि गोड असल्याने ते पहिल्यांदा ऐकतानाही मनाला भिडते. प्रेमातील निरागसता, भावना आणि हळुवारपणा या गाण्यातून प्रभावीपणे व्यक्त होतो. त्यामुळे अनेक दशकांनंतरही हे गाणं रोमँटिक गाण्यांच्या यादीत आपले स्थान टिकवून आहे.

आजही मनाला शांत करते गाणं

आजच्या काळातील वेगवान आणि आधुनिक संगीताच्या तुलनेत ‘अंखियों के झरोखों से’सारख्या गाण्यांमध्ये एक वेगळीच शांतता जाणवते. गाण्याची गोड चाल, साधे शब्द आणि हेमलता यांचा मधुर आवाज यामुळे हे गाणं आजही श्रोत्यांना जुन्या आठवणींमध्ये घेऊन जाते.

1978 मध्ये प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाला आता जवळपास पाच दशके होत आली आहेत. तरीही ‘अंखियों के झरोखों से’ हे शीर्षकगीत आजच्या पिढीलाही तितकेच भावते. लता मंगेशकर किंवा आशा भोसले नाही, तर हेमलता यांच्या आवाजाने अजरामर केलेले हे गाणं जुन्या हिंदी संगीताचा एक सुंदर ठेवा म्हणून आजही रसिकांच्या मनात जिवंत आहे.

Follow Us
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी...
उद्धव ठाकरे- एकनाथ शिंदे यांना दिलासा की धक्का? वसंत डावखरे प्रकरणी नेमकं काय घडणार?
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ
अमृता फडणवीसांकडून मनोज जरांगेंना जेवणाचं आमंत्रण; म्हणाल्या, माझे भाऊ...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा थेट...
पीएमओ बनावट ओळखपत्र प्रकरणात मोठा ट्विस्ट; आरोपीच्या वडिलांचा धक्कादायक प्रकार
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
अमित ठाकरे यांच्या कृतीवर भाजप आक्रमक, कल्याण सभा दिवसभर तहकूब
बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
Sanjay Gaikwad : बुलढाण्यात भाजप-शिवसेनेचा संघर्ष पेटला, थेट आमनेसामने...
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं..
व्यवस्थेविरुद्ध एकत्र लढा; प्रथमेशच्या घटनेनंतर अभिजीत दीपकेंचं मोठं आवाहन, आता...
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्ष
राष्ट्रवादी पक्षाच्या विलिनीकरणाबाबत... दत्ता भरणेंनी स्पष्ट केली पक्षाची भूमिका
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा...
पार्थ पवारांच्या भूमिकेवर मुंबई हायकोर्टाचे मोठं स्पष्टीकरण; मुंडवा गैरव्यवहार प्रकरणाला नवे वळण
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख...
केंद्रीय कॅबिनेटच्या बैठकी सर्वात मोठा निर्णय; देशातील प्रमुख महानगरांना जोडणाऱ्या रेल्वे नेटवर्कला मंजुरी
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटील....
माझे कान 40 टक्के तर डीजेच्या आवाजामुळे खराब झाले; गुलाबराव पाटलांच्या भाषणाची तुफान चर्चा