मोठी बातमी: मोदींकडून भ्रमनिरास झाल्याचे 'ते' रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट

एकनाथ खडसे यांनी हे ट्विट रिट्विट करून पहिल्यांदाच भाजपविरोधी भूमिका घेतली आहे. | Eknath Khadse

मोठी बातमी: मोदींकडून भ्रमनिरास झाल्याचे 'ते' रिट्विट एकनाथ खडसेंकडून डिलीट

मुंबई: भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याचे जाहीर संकेत दिले आहेत. एकनाथ खडसे यांनी बुधवारी राष्ट्रवादीच्या जयंत पाटील यांनी केलेले एक ट्विट रिट्विट केले. या ट्विटमध्ये जयंत पाटील यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर टीका केली होती. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी महाराष्ट्राचा, देशाचा भ्रमनिरास केला, असे जयंत पाटलांनी म्हटले होते. एकनाथ खडसे यांनी हे ट्विट रिट्विट करून पहिल्यांदाच भाजपविरोधी भूमिका घेतली होती. आतापर्यंत देवेंद्र फडणवीस आणि चंद्रकांत पाटील हे भाजपचे प्रमुख नेते खडसे राष्ट्रवादीत जाणार नाहीत, असे सांगत होते. मात्र, आता खडसे यांनी थेट नरेंद्र मोदी यांच्याविरोधात भूमिका घेतल्यानंतर भाजपचे नेते कशाप्रकारे व्यक्त होणार, याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. (Eknath Khadse retweet NCP Jayant Patil tweet)

एकनाथ खडसेंच्या या रिट्विटवरुन साहजिकच प्रचंड चर्चा रंगली होती. यानंतर खडसे यांनी आपल्या अकाऊंटवरुन हे रिट्विट डिलीट करुन टाकले. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या मनात नक्की चाललंय तरी काय, असा प्रश्न अनेकांना पडला आहे.

 

सूत्रांच्या माहितीनुसार एकनाथ खडसे गुरुवारी मुंबईत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार आहेत. त्यासाठी खडसेंचा बालेकिल्ला असणाऱ्या मुक्ताईनगरात कालपासून तयारीला सुरुवातही झाली होती. एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी बॅनरवरुन कमळ गायब केलं आहे. खडसेंच्या मुक्ताईनगरात समर्थकांनी बॅनरबाजीला सुरुवात केली आहे. “नाथाभाऊ तुम्ही बांधाल तेच तोरण, तुम्ही ठरवाल तेच धोरण” असे बॅनर समर्थकांनी झळकावले आहेत. एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशासाठी कार्यकर्त्यांनी मुंबईला जाण्यासाठी आपल्या गाड्यांवरती स्टिकर्स लावले आहेत.

रक्षा खडसे भाजपमध्येच थांबण्याची चिन्हं

एकनाथ खडसे यांच्यासोबत भाजपचे अनेक नेते आणि स्थानिक पदाधिकारी राष्ट्रवादीत प्रवेश करण्याची शक्यता आहे. मात्र, एकनाथ खडसे यांच्या स्नुषा रक्षा खडसे भाजपमध्येच राहणार असे सांगितले जात आहे. काही दिवसांपूर्वीच रक्षा खडसे यांनी शेतकऱ्यांच्या प्रश्नांवर चर्चा करण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली होती. यावेळी या दोघांमध्ये चर्चा झाली. यानंतर रक्षा खडसे यांनी भाजपमध्येच राहण्याचा निर्णय घेतल्याचे वृत्त आहे.

घटस्थापनेचा मुहूर्त टळला

यापूर्वी एकनाथ खडसे हे घटस्थापनेच्या दिवशी राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. हा अंदाज फोल ठरला होता. यानंतर खडसे यांनी ‘प्रसारमाध्यमांनीच माझ्या प्रवेशाचा मुहूर्त काढला होता, तो चुकला’, असे म्हटले होते. तसेच मी अजून भाजपमध्येच असल्याचे त्यांनी सांगितले होते. तर दुसरीकडे भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनीही खडसे भाजप सोडून जाणार नाहीत, असा दावा केला होता. त्यामुळे एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. मात्र, आता पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाची तारीख निश्चित झाल्याचे सांगण्यात येत आहे.

संबंधित बातम्या 

एकनाथ खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाचा मुहूर्त ठरला; कार्यकर्त्यांना मुंबईत येण्याच्या सूचना? 

‘नाथाभाऊ…लवकर राष्ट्रवादीत या’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकनाथ खडसेंना विनंती

Sharad Pawar | निर्णय काय घ्यायचा हा एकनाथ खडसेंचा प्रश्न : शरद पवार

एकनाथ खडसेंसह कन्या भाजपला धक्का देण्याच्या तयारीत, खासदार सूनबाईंचं काय?

(Eknath Khadse retweet NCP Jayant Patil tweet)

 

कमेंट करा

कमेंट करा

Your email address will not be published. Required fields are marked *