एकनाथ खडसेंसह कन्या भाजपला धक्का देण्याच्या तयारीत, खासदार सूनबाईंचं काय?

एकनाथ खडसेंसह कन्या रोहिणी खडसे-खेवलकर आणि खडसेंच्या संपर्कातील दहा ते पंधरा आमदार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करण्याची चिन्हं आहेत

एकनाथ खडसेंसह कन्या भाजपला धक्का देण्याच्या तयारीत, खासदार सूनबाईंचं काय?

जळगाव : भाजपमध्ये नाराज असलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे (Eknath Khadse) राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याचं खात्रीलायक वृत्त सूत्रांनी दिलं आहे. खडसेंसह त्यांची कन्या रोहिणी खडसे-खेवलकर पक्षांतर करतील, पण भाजपच्या तिकीटावर खासदार झालेल्या सूनबाई रक्षा खडसे (Raksha Khadse) काय निर्णय घेणार, याकडे सर्वांचं लक्ष आहे. (Eknath Khadse may enter NCP with daughter MP daughter in law Raksha Khadse to stay in BJP)

नवरात्रोत्सवाच्या पहिल्याच दिवशी एकनाथ खडसे राष्ट्रवादीत प्रवेश करणार असल्याची चर्चा होती. मात्र विजयादशमी किंवा त्याआधी खडसे सीमोल्लंघन करत मोठा भाजपला धक्का देतील, असं बोललं जातं.

एकनाथ खडसे यांची सून रक्षा खडसे रावेरच्या खासदार आहेत. दुसऱ्यांदा खासदारपद मिळालेल्या रक्षा खडसे यांच्याकडे भाजपने महाराष्ट्र कार्यकारिणीत मंत्रिपदाची जबाबदारी दिली आहे. दुसऱ्या टर्ममध्ये केवळ दीड वर्ष झाल्याने रक्षा खडसे भाजपमध्येच राहतील आणि उर्वरित चार वर्ष पूर्ण करतील, असा अंदाज आहे.

एकनाथ खडसे यांच्यासह रोहिणी खडसे-खेवलकर आणि खडसेंच्या संपर्कातील दहा ते पंधरा आमदार राष्ट्रवादीत पक्षप्रवेश करतील, असं खात्रीलायक वृत्त आहे. विधानसभा निवडणुकीत एकनाथ खडसेंना डावलून भाजपने त्यांच्या कन्येला तिकीट दिलं होतं. मात्र राष्ट्रवादी पुरस्कृत उमेदवाराकडून त्यांना पराभव स्वीकारावा लागला. आता खडसे बापलेकीने राष्ट्रवादीचा झेंडा हाती धरल्यास उत्तर महाराष्ट्रात भाजपला मोठा धक्का बसण्याची शक्यता आहे.

“मीडियाने प्रवेशाचे मुहूर्त काढले”

एकनाथ खडसे यांनी मीडियाने माझ्या प्रवेशाचे मुहूर्त काढले होते. त्यामुळे ते चुकले, असं सांगतानाच योग्य वेळ येईल. वाट पाहा, असं विधान केलं आहे. पक्षांतराबाबत खडसे यांनी पहिल्यांदाच थेट आणि सूचक विधान केल्याने खडसे यांच्या राष्ट्रवादीतील प्रवेशाच्या चर्चांनी पुन्हा जोर धरला आहे. (Eknath Khadse may enter NCP with daughter MP daughter in law Raksha Khadse to stay in BJP)

खडसे- देशमुख खलबतं

राष्ट्रवादीचे नेते आणि गृहमंत्री अनिल देशमुख काल जळगावात होते. एकनाथ खडसे यांच्यासोबत रावेर हत्याकांडातील कुटुंबीयांची विचारपूस त्यांनी केली. त्याआधी शासकीय विश्रामगृहात दोघांमध्ये चर्चाही झाली. यावेळी काय बातचित झाली, याचा तपशील दोघांनीही सांगितला नाही. परंतु देशमुख यांनी खडसे यांची भेट घेतल्याने पुन्हा एकदा खडसेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाच्या चर्चांना बळ मिळाले आहे.

संबंधित बातम्या:

एखादा नेता पक्षात आल्यावर फायदा होता, तसा गेल्यावर तोटा होतो, पंकजा मुंडेंचं खडसेंवर भाष्य

एकनाथ खडसेंचा संभाव्य राष्ट्रवादी प्रवेश, सुप्रिया सुळेंनी चेंडू ‘या’ नेत्याकडे टोलवला

(Eknath Khadse may enter NCP with daughter MP daughter in law Raksha Khadse to stay in BJP)

Published On - 12:08 pm, Sun, 18 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI