एकनाथ खडसेंचा संभाव्य राष्ट्रवादी प्रवेश, सुप्रिया सुळेंनी चेंडू ‘या’ नेत्याकडे टोलवला

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलणं टाळलं.

एकनाथ खडसेंचा संभाव्य राष्ट्रवादी प्रवेश, सुप्रिया सुळेंनी चेंडू 'या' नेत्याकडे टोलवला

पुणे : भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबद्दल दोन्ही पक्षातील नेत्यांची अळीमिळी गुपचिळी सुरुच आहे. आधी भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी खडसेकाकांच्या पक्षांतराचा चेंडू त्यांच्या सूनबाई – खासदार रक्षा खडसेंकडे टोलवला होता, आता राष्ट्रवादीच्या खासदार सुप्रिया सुळे यांनी प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याकडे बोट दाखवलं आहे. (NCP MP Supriya Sule says ask Jayant Patil about Eknath Khadse possibly entering NCP)

एकनाथ खडसे यांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांना विचारा, असं म्हणत खासदार सुप्रिया सुळे यांनी बोलणं टाळलं. नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसे राष्ट्रवादीचे घड्याळ हाती बांधण्याची चर्चा आहे. मात्र अवघ्या काही तासांवर घटस्थापना आली असतानाही त्याबद्दल स्पष्टता नाही.

“पवार कुटुंबियांवर टीकेशिवाय हेडलाइन्स होत नाहीत”

भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी ज्या भागात कृषी विधेयकासाठी रॅली काढली, त्याच भागात साखर कारखाना बंद आहे. पवार कुटुंबियांवर टीका केल्याशिवाय हेडलाइन्स होत नाहीत, कोणीही यावं आणि मनमोकळं करावं, आम्ही दिलदार आहोत, असा टोलाही सुप्रिया सुळेंनी लगावला.

दरम्यान, पुण्यामध्ये गेल्या दोन वर्षात पूरपरिस्थिती निर्माण होत आहे. त्यामुळे याला आम्ही जबाबदार असल्याच्या आरोपात तथ्य नाही. पुण्यातील पुरास कारणीभूत ठरलेल्या अंबिल ओढयाची वर्क ऑर्डर दोन दिवसात काढणार, लवकरच हा विषय मार्गी लागणार, असे आश्वासनही सुप्रिया सुळेंनी दिले.

सुरक्षा भिंत दोन वर्षांपूर्वी पडली आणि अजूनही त्याचं काम पूर्ण झालं नाही. तर यामध्ये 25 वर्षांचा हिशोब कसा होऊ शकतो? असा प्रतिप्रश्न सुप्रिया सुळेंनी महापौर मुरलीधर मोहोळ यांना विचाराला. टीका करावी पण कामही करावं, असा टोला सुळेंनी लगावला. अतिवृष्टीग्रस्तांना केंद्राकडून मदतीसाठी पंतप्रधानांकडे प्रयत्न करु, असंही त्या म्हणाल्या.

गेल्या 20 ते 25 वर्षांपासून सत्ताधाऱ्यांनी दूरदृष्टी ठेवली असती तर आज ही परिस्थिती उद्भवली नसती. किंबहुना पुणे महापालिका चांगलं काम करत आहे, असं महापौर मुरलीधर मोहोळ म्हणाले होते. (NCP MP Supriya Sule says ask Jayant Patil about Eknath Khadse possibly entering NCP)

संबंधित बातम्या :

खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सूनबाईंना विचारा, प्रीतम मुंडेंची गुगली

…तर ही परिस्थिती उद्भवली नसती, पुण्याच्या महापौरांचा सुप्रिया सुळेंवर पलटवार

(NCP MP Supriya Sule says ask Jayant Patil about Eknath Khadse possibly entering NCP)

Published On - 12:20 pm, Fri, 16 October 20

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI