AQI
Sign In

By signing in or creating an account, you agree with Associated Broadcasting Company's Terms & Conditions and Privacy Policy.

Pritam Munde | खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सूनबाईंना विचारा, प्रीतम मुंडेंची गुगली

एकनाथ खडसेंच्या संभाव्य राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे यांना विचारायला हवा असं प्रीतम मुंडे म्हणाल्या.

Pritam Munde | खडसे काकांच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत सूनबाईंना विचारा, प्रीतम मुंडेंची गुगली
| Updated on: Oct 14, 2020 | 4:58 PM
Share

बीड : ‘खडसे काका’ अर्थात भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांचा निर्णय योग्य वेळ आल्यावरच कळेल, राष्ट्रवादी प्रवेशाबाबतचा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे यांना विचारा, असे म्हणत बीडच्या भाजप खासदार प्रीतम मुंडे यांनी गुगली टाकली. मुंडे आणि खडसे कुटुंबाचे जवळचे स्नेह असल्याने प्रीतम मुंडेंना खडसेंच्या संभाव्य पक्षांतरवर प्रश्न विचारण्यात आला होता. (Beed BJP MP Pritam Munde asks to question Raksha Khadse about Eknath Khadse’s decision to enter NCP)

एकनाथ खडसे राष्ट्रवादीच्या वाटेवर असल्याच्या चर्चेला राज्यात उधाण आले आहे. खडसे येत्या घटस्थापनेला राष्ट्रवादीत प्रवेश करतील, असं भाकितही राजकीय वर्तुळातून वर्तवण्यात येत आहे. बीडमध्ये पत्रकारांनी खासदार प्रीतम मुंडे यांना खडसे प्रकरणावर प्रश्न विचारले.

प्रीतम मुंडेंनी हा प्रश्न त्यांच्या खासदार सूनबाई रक्षा खडसे यांना विचारायला हवा असं सांगत खडसेंवर बोलण्यास नकार दिला. खडसे काका यांचा निर्णय योग्य वेळ आल्यावर कळेलच असंही त्या म्हणाल्या.

नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसे राष्ट्रवादीत?

भाजपचे ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे येत्या घटस्थापनेला राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याची चर्चा आहे. राष्ट्रवादीच्या अनेक कार्यकर्त्यांनी आणि एकनाथ खडसे यांच्या समर्थकांनी आपल्या व्हॉटसअॅपला तसे स्टेटस ठेवले आहेत. यामध्ये ‘तुमचे राष्ट्रवादीत स्वागत आहे’, ‘आम्ही तुमच्या पाठीशी आहोत’, असा मजकूर पाहायला मिळत आहे. त्यामुळे राष्ट्रवादी काँग्रेस एकनाथ खडसे यांच्या पक्षप्रवेशासाठी वातावरणनिर्मिती करत असल्याचा अंदाज राजकीय जाणकारांकडून व्यक्त केला जात आहे.

त्यानंतर विधानपरिषेदवर राज्यपालनियुक्त सदस्य म्हणून राष्ट्रवादीतर्फे त्यांची वर्णी लागण्याची शक्यता आहे. विधानपरिषेदवर लवकरच राज्यपालनियुक्त 12 सदस्यांची नियुक्ती होणार आहे. राज्य मंत्रिमंडळाच्या बैठकीत तसा प्रस्ताव मांडला जाण्याची शक्यता आहे. एकनाथ खडसे यांच्यासारखा अभ्यासू आणि फर्डा वक्ता विधानपरिषदेवर गेल्यास राष्ट्रवादी काँग्रेसची सभागृहातील बाजू आणखी भक्कम होईल.

संबंधित बातम्या :

नवरात्रीच्या पहिल्या माळेला खडसेंचा राष्ट्रवादीत प्रवेश निश्चित, माजी आमदाराचा दावा

(Beed BJP MP Pritam Munde asks to question Raksha Khadse about Eknath Khadse’s decision to enter NCP)

बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो
बहरीनमध्ये जय पवार यांची हळदी, बघा दिमाखदार सोहळ्याचे फोटो.
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं
पार्थ पवारांच्या कंपनीचा 42 कोटी भरण्यास नकार, बावनकुळेंनी ठणकावलं.
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!
रविंद्र चव्हाणांकडून समझोता, पण निलेश राणे तयार नाही!.
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?
महायुतीतील मतभेद दूर, आगामी निवडणुका एकत्र लढणार! बघा कोण काय म्हणालं?.
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?
राणीच्या बागेतील दोन्ही वाघांचा मृत्यू, कारण लपवण्याचं कारण काय?.
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'
'अडीच वर्षाचा स्पीड ब्रेकर सोडला, तर गेल्या 11 वर्षात प्रगतीचं...'.
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर
पुतीन यांची भारताला मोठी ग्वाही अन् रशिया-भारत करारांवर दिला भर.
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना..
भारत-रशियात महत्त्वपूर्ण करार, PM मोदी म्हणाले आता व्यापारी संबंधाना...
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?
भाजप-ठाकरे सेनेचा कामगार युनियनवरून राडा, वांद्र्यानंतर वरळीत घडल काय?.
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?
सुट्ट्यांबाबत इंडिगोचे नियम शिथिल, DGCA कडून जारी केलेले नवे आदेश काय?.