‘नाथाभाऊ…लवकर राष्ट्रवादीत या’, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकनाथ खडसेंना विनंती

भाजप नेते एकनाथ खडसे यांना राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करण्याची विनंती, राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांकडून एकनाथ खडसेंची भेट

'नाथाभाऊ...लवकर राष्ट्रवादीत या', राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची एकनाथ खडसेंना विनंती
Follow us
| Updated on: Oct 16, 2020 | 10:39 AM

जळगाव: भाजपचे ज्येष्ठ पण नाराज असलेले नेते एकनाथ खडसे राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याचं आता निश्चित मानलं जात आहे. राष्ट्रवादीकडून खडसेंना सन्मानाची जागा देण्याची तयारीही सुरु असल्याचं कळतंय. त्या पार्श्वभूमीवर आज जळगावमधील राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी एकनाथ खडसे यांची भेट घेतली. मुक्ताईनगर इथल्या घरी जात राष्ट्रवादीचे कार्यकर्ते खडसेंना भेटले. खडसे यांनीही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचं हसत स्वागत केलं. ‘साहेब तुम्ही लवकर राष्ट्रवादीत या’, अशी विनंती या कार्यकर्त्यांनी खडसेंना केली आहे. (NCP workers meets Eknath Khadse in Muktainagar)

एकनाथ खडसे भाजपला रामराम ठोकत राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश करणार असल्याच्या चर्चेनं जोर धरलाय. त्या पार्श्वभूमीवर राज्यभरातील खडसेंचे चाहते आणि राष्ट्रवादीचे कार्यकर्ते मुक्ताईनगरला येऊन त्यांची भेट घेत आहेत.

एकनाथ खडसेंची खदखद

पुण्यातील जमीन प्रकरणानंतर एकनाथ खडसे यांनी मंत्रिपदाचा राजीनामा दिला. त्यानंतर एकनाथ खडसे यांना राज्याच्या राजकारणापासून भाजप नेत्यांनी दोन हात लांबच ठेवलं. खडसेंनी आपली खदखद कधी भाजप नेतृत्वाकडे तर कधी जाहीररित्या मांडली. पण तरीही खडसेंचं पुनर्वसन काही झालं नाही. दरम्यान, विधानसभा निवडणुकीत खडसेंना तिकीट न देता त्यांची मुलगी रोहिणी खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. पण त्यांना परभवाचा सामना करावा लागला. आपल्याच पक्षातील काही लोक त्याला जबाबदार असल्याची खडसे यांची भावना आहे.

भाजपकडून मनधरणीचे प्रयत्न

भाजप नेत्यांकडूनही खडसे यांची मनधरणी करण्याचे प्रयत्न सुरु आहेत. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस जामनेरमध्ये एका खासगी कार्यक्रमासाठी गेले होते. त्यावेळी खडसे यांना उपस्थित राहण्याची विनंती करण्यात आली होती. पण वैयक्तिक कारण देत कार्यक्रमाला उपस्थित राहता येणार नसल्याचं खडसेंनी महाजनांना कळवलं.

भाजप प्रदेष कार्यकारिणीच्या मुंबईतील बैठकीला एकनाथ खडसे व्हीडिओ कॉन्फरन्सिंगच्या माध्यमातून उपस्थिती लावली होती. तेव्हा भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी एकनाथ खडसे यांना भावनिक साद घालण्याचा प्रयत्नही केला होता. ‘एकनाथ खडसे यांनी आमच्या दोन थोबाडीत द्याव्यात. मात्र, प्रसारमाध्यमांसमोर जाऊन नाराजी व्यक्त करू नये’, असे चंद्रकांत पाटील यांनी म्हटले होते.

संबंधित बातम्या:

ठाकरे सरकारमध्ये एकनाथ खडसेंचं स्थान जवळपास निश्चित, कृषिमंत्रीपद मिळण्याची चिन्हं

फडणवीसच म्हणाले होते जलयुक्त शिवारची चौकशी करा, एकनाथ खडसेंची पहिली प्रतिक्रिया

NCP workers meets Eknath Khadse in Muktainagar

Non Stop LIVE Update
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?
जलील बोलका पोपट आणि चंद्रकांत खैरे नाकारलेला उमेदवार, कुणी केली टीका?.
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा
गोविंदाचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, मुख्यमंत्र्यांच्या उपस्थित घोषणा.