Corona effect | दहावीच्या परीक्षेत एका वर्गात केवळ 12 विद्यार्थीच, शिक्षकांकडून खबरदारी

राज्यात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत (Caution on Corona Virus).

Corona effect | दहावीच्या परीक्षेत एका वर्गात केवळ 12 विद्यार्थीच, शिक्षकांकडून खबरदारी

चंद्रपूर : राज्यात कोरोना आजाराच्या पार्श्वभूमीवर खबरदारीच्या उपाययोजना आखल्या जात आहेत (Caution on Corona Virus). सध्या दहावीची परीक्षा सुरु आहे. या परीक्षेदरम्यानही एका वर्गात कमाल बारा विद्यार्थी बसविले जात असून त्यांच्यातील अंतर निर्देशानुसार कायम ठेवले जात आहे. यामुळे शाळांनाही परीक्षेसाठी अधिक वर्गखोल्या उपलब्ध करुन द्याव्या लागत आहेत. वाढीव संख्येतील शिक्षक आणि स्टाफची परीक्षा कामासाठी नियुक्ती करावी लागत आहे (Caution on Corona Virus).

हे सर्व उपाय कोरोना आजाराचा प्रसार रोखण्यासाठी केले जात असून, आम्ही प्रशासनाला यात सहकार्य करत असल्याची भूमिका शाळांनी घेतली आहे.

दरम्यान टाळता न येण्यासारख्या बारावी आणि दहावीच्या परीक्षांसाठी कोरोना विषाणूजन्य आजाराच्या खबरदारीच्या पार्श्वभूमीवर राज्यभर पावले उचलली जात आहेत. सध्या चंद्रपूर जिल्ह्यात एकही बाधित रुग्ण आढळला नाही. जिल्हा प्रशासन मात्र याबाबत योग्य ती काळजी घेत आहे.

परदेशातून परतलेल्या नागरिकांसाठी 14 दिवसांची घरीच देखरेख मोहीम आखली गेली आहे. तर नागपूरच्या प्रयोगशाळेत पाठविले सर्व 14 नमुने निगेटिव्ह आल्याने प्रशासनाने सर्व लक्ष प्रसार रोखण्याच्या कार्यात लावले आहे.

संबंधित बातम्या :

निम्म्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’ न दिल्यास कंपनीवर कारवाई

Corona | हातावर विलगीकरणाचे शिक्के, तरीही रेल्वेने प्रवास, पालघरजवळ चेन खेचून ट्रेन रोखली!

Click on your DTH Provider to Add TV9 MARATHI