Nagpur Corona : नागपूरमध्ये रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ, 65 पेक्षा अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण

| Updated on: Aug 14, 2020 | 8:21 AM

नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे (Corona infected Doctors Nagpur).

Nagpur Corona : नागपूरमध्ये रुग्ण संख्येत झपाट्याने वाढ, 65 पेक्षा अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण
Follow us on

नागपूर : नागपूरमध्ये कोरोना रुग्णांच्या संख्येत झपाट्याने वाढ होत आहे (Corona infected Doctors Nagpur). कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी स्थानिक प्रशासनाकडून अनेक प्रयत्न केले जात आहे. नागपुरात आतापर्यंत एकूण 65 पेक्षा अधिक डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. नागपूरमधील मेडिकल रुग्णालयात या आठवड्यात एकूण 36 डॉक्टर कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. मोठ्या संख्येने डॉक्टरांना कोरोनाची लागण होत असल्याने एकच खळबळ उडाली आहे (Corona infected Doctors Nagpur).

नागपुरातील मेयो रुग्णालयातही या आठवड्यात 31 डॉक्टरांना कोरोनाची लागण झाली आहे. कोरोनाबाधीत सर्व डॉक्टरांवर उपचार सुरु आहेत. कोरोनातून बरे झाल्यानंतर पुन्हा सर्व डॉक्टर कोरोना वॉर्डात रुग्णसेवा करणार आहेत. डॉक्टर जीव धोक्यात घालून रुग्णसेवा करत आहेत.

नागपुरातील रिकव्हरी रेट घटला, आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली

नागपुरातील कोरोना रुग्णांचं बरं होण्याचं प्रमाण घटलं आहे. रिकव्हरी रेट घटून 47.11 टक्क्यांवर गेला आहे. हा रेट 31 मे रोजी 71.47 टक्के होता. पण त्यात मोठ्या प्रमाणात घट झाल्याचे दिसत आहे. त्यामुळे स्थानिक प्रशासनाची चिंता वाढली आहे.

एकीकडे कोरोना रुग्णांची संख्या झपाट्यानं वाढत असताना बरे होणाऱ्या रुग्णांची संख्या त्या तुलनेत वाढत नसल्याचे दिसत आहे. त्यामुळे आरोग्य यंत्रणेची चिंता वाढली आहे.

संबंधित बातम्या :

कोरोना रुग्ण 20 तास रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत, मुख्यमंत्र्यांनी इकडेही लक्ष द्यावं, नागपूरमधील नगराध्यक्षाची मागणी

Tukaram Munde | नागपूर मनपा आयुक्त मुंढे PPE किट घालून थेट कोरोना वॉर्डात, रुग्णांची विचारपूस