कोरोना रुग्ण 20 तास रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत, मुख्यमंत्र्यांनी इकडेही लक्ष द्यावं, नागपूरमधील नगराध्यक्षाची मागणी

नागपूरमध्ये एका कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्यासाठी तब्बल 20 तास ताटकाळत वाट पाहावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (No Ambulance for corona patient in Nagpur).

कोरोना रुग्ण 20 तास रुग्णवाहिकेच्या प्रतीक्षेत, मुख्यमंत्र्यांनी इकडेही लक्ष द्यावं, नागपूरमधील नगराध्यक्षाची मागणी
Follow us
| Updated on: Jul 24, 2020 | 12:12 PM

नागपूर : वाढत्या कोरोना रुग्णांसोबतच आरोग्य सुविधांच्या कमतरतेचाही प्रश्न समोर येत आहे. नागपूरमधील बुटीबोरीमध्ये एका कोरोना रुग्णाला रुग्णालयात दाखल होण्यासाठी तब्बल 20 तास ताटकाळत वाट पाहावी लागल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे (No Ambulance for corona patient in Nagpur). यावर बुटीबोरीचे नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी तीव्र नाराजी व्यक्त करत फक्त मुंबईकडे लक्ष न देता आमच्याकडेही लक्ष द्या, असं आवाहन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे आणि आरोग्यमंत्री राजेश टोपे यांना केलं.

नगराध्यक्ष बबलू गौतम यांनी बुटीबोरीच्या प्रशासनावर गंभीर आरोप केले आहेत. ‘कोरोना रुग्णांना नेण्यासाठी रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत. रुग्णवाहिका उपलब्ध न झाल्याने एका कोरोना रुग्णाला तब्बल 20 तास घरीच वाट पाहावी लागली. यावेळी हा रुग्ण आपल्या कुटुंबासोबत होता. आम्हीही महाराष्ट्राचे नागरिक आहोत. मुख्यमंत्री आणि आरोग्यमंत्र्यांनी फक्त मुंबईकडे लक्ष न देता आमच्याकडेही लक्ष द्यावं,’ असं संतप्त मत बबलू गौतम यांनी व्यक्त केलं.

TOP 9 | लोकल ते ग्लोबल, सर्व बातम्या एकत्र, पाहा टॉप 9 न्यूज!

बबलू गौतम म्हणाले, “ग्रामीण भागात कोरोनाचे रुग्ण वाढत आहेत, पण प्रशासनाकडून पुरेशा सोई सुविधा नाही. त्यामुळे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आरोग्यमंत्री राजेश टोपे आणि महसूल मंत्री बाळासाहेब थोरात यांनी फक्त मुंबईकडे लक्ष न देता आमच्याकडेही लक्ष द्यावं. आम्हीही महाराष्ट्राचेच नागरिक आहोत.” बुटीबोरी शहराला लागूनच आशिया खंडातली सर्वात मोठी एमआयडीसी आहे. शिवाय ही मोठी बाजारपेठ असल्यानं लोकांची येजा जास्त आहे. त्यामुळे बुटीबोरीत क्वॉरंटाईन सेंटर उभारण्याची मागणीही यावेळी बबलू गौतम यांनी केली.

दरम्यान, नागपूर जिल्ह्यात गुरुवारी (23 जुलै) 172 नव्या कोरोना रुग्णांची भर पडली. यापैकी नागपूर ग्रामीणमध्ये 62 रुग्ण, तर शहरात 100 नव्या रुग्णांची नोंद झाली. जुलै महिन्याच्या 23 दिवसांमध्येच नागपूर जिल्ह्यात तब्बल 1960 कोरोना रुग्ण वाढले आहेत.

MahaFast News 100 | शंभर बातम्यांचा बुलेटच्या वेगाने आढावा, पाहा महाफास्ट न्यूज 100 न्यूज, दररोज टीव्ही 9 मराठीवर!

कामठीत 40 नव्या कोरोना रुग्णांची नोंद झाली. यासह आता नागपूर जिल्ह्यातील एकूण कोरोना रुग्णसंख्या 3465 वर पोहचली आहे. गुरुवारी 2 कोरोना रुग्णांचा मृत्यू झाला, यासह आता नागपूरमधील एकूण कोरोना बळीची संख्या 65 वर पोहचली आहे. नागपुरात उपचारानंतर बरे झाल्याने काल 100 कोरोना रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आला. आतापर्यंत 2213 रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.

हेही वाचा :

Pune Lockdown | पुणेकरांचा लॉकडाऊन संपला, पूर्वीच्या निर्बंधांसह नवे नियम जाहीर

‘नगरसेवक हरवले, आता आजारात सोडलं, तसं आम्ही मतदान करताना सोडणार’, पुण्यात युवक काँग्रेसची बॅनरबाजी

पुण्यात कंटेनमेंट झोनमध्ये जनजागृतीसाठी पोलीस सायकलवर, वरिष्ठ पोलीस निरीक्षकांचा अनोखा उपक्रम

No Ambulance for corona patient in Nagpur

Non Stop LIVE Update
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?
महायुतीत जागा वाटपावरून तिढा कायम, कुठं अंतर्गत रस्सीखेच तर पेच कायम?.
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले
भाजपवरून शिंदे गटात अंतर्गत नाराजी,अनेक मतदारसंघ भाजपने स्वतःकडे खेचले.
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत
शिवसेनेत गोविंदाची एन्ट्री अन् दादांचं 15 दिवसांपूर्वी वक्तव्य चर्चेत.
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका
तर भाजपात पहिली उडी मारणारे सुनील तटकरे असतील रोहित पवार यांची टीका.
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी
शिवसेनेची पहिली यादी जाहीर, सात विद्यमान खासदारांना पुन्हा संधी.
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत
एका जागेसाठी कॉंग्रेसला देशाचे पंतप्रधान पद घालवायचं का ? - संजय राऊत.
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास
आनंद दिघेंचा शिष्य यंदा मारणार हॅट्रीक, केदार दिघे यांचा विश्वास.
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत
ओवेसी आणि इम्तियाझ यांनी चष्म्याचे नंबर बदलावे -केंद्रीय मंत्री भागवत.
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?
लवकरच बरा होऊन... दिलीप वळसे पाटील यांचं दुखापतीनंतर पहिलं टि्वट काय?.
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?
शिवसेनेत पक्ष प्रवेश करताच गोविंदाला हवी 'ही' जबाबदारी, शिंदे देणार?.