ड्रग्ज प्रकरणातील कोरोना पॉझिटीव्ह आरोपीचे रुग्णालयातून पलायन; मुंबई पोलिसांची शोधाशोध

मुंबईच्या जीटी रुग्णालयातून ड्रग्ज प्रकरणातील एका आरोपीने पलायन केलं आहे. हा आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे.

ड्रग्ज प्रकरणातील कोरोना पॉझिटीव्ह आरोपीचे रुग्णालयातून पलायन; मुंबई पोलिसांची शोधाशोध
| Updated on: Nov 06, 2020 | 12:34 PM

मुंबई : मुंबईच्या जीटी रुग्णालयातून ड्रग्ज प्रकरणातील एका आरोपीने पलायन केलं आहे (Corona Positive Accused). हा आरोपी कोरोना पॉझिटिव्ह असल्याची माहिती आहे. छोटू लालमन वर्मा असं या आरोपीचं नाव असून त्याला भायखळा पोलीसांनी ड्रग्स प्रकरणात अटक केली होती. मात्र, आता तो रुग्णालयातून फरार झाल्याने पोलीस त्याचा शोध घेत आहेत (Corona Positive Accused).

भायखळा पोलीस स्टेशन येथे ड्रग्ज प्रकरणात (Drugs Case) 27 ऑक्टोबर रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता. हा गुन्हा 8 (क) सह 22 (क) एनडीपीएस कायद्यानुसार, दाखल करण्यात आला होता. या प्रकरणात छोटू लालमन वर्माला अटक करण्यात आली होती.

छोटू लालमन वर्मा हा ड्रग्जचा धंदा करत होता. वर्माजवळ 126 ग्राम एमडी हे ड्रग्ज सापडलं होत. त्यामुळे भायखळा पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यानंतर पोलिसांनी त्याला मुंबई सत्र न्यायालयात हजर केलं असता त्याला 4 नोव्हेंबरपर्यंतची पोलीस कोठडी सुनावण्यात आली होती.

मात्र, वर्माची कोरोना चाचणी केली असता तो कोरोन पॉझिटिव्ह असल्याचं समोर आलं होतं. त्यामुळे न्यायालयाच्या आदेशानुसार, वर्माला जीटी रुग्णालयातील कोव्हिड-19 वॉर्डमध्ये भरती करण्यात आलं होतं.

5 नोव्हेंबर रोजी पोलीस वर्माला न्यायालयात हजर करण्यासाठी ताब्यात घेण्यासासाठी गेले असता वर्मा पळून गेल्याच लक्षात आलं. याबाबत आता आझाद मैदान पोलीस ठाण्यात वर्माविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सध्या पोलीस त्याचा शोध घेत आहेत.

Corona Positive Accused

संबंधित बातम्या :

Drugs Connection | करिश्मा प्रकाशची सहा तास झाडाझडती; गुरुवारी पुन्हा चौकशी होणार

पुण्यातील तरुणाची पनवेलमध्ये गळा दाबून हत्या; डायरीवरुन मृताची ओळख पटली; तपास सुरु

मुंबईच्या कोव्हिड सेंटरमध्ये विवाहितेचा विनयभंग, सुरक्षारक्षकाला एक दिवस पोलीस कोठडी