कोरोनाचा धसका, मास्क घेण्यासाठी धावाधाव, रत्नागिरीत एका मास्कची किंमत…

कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्कचा गोरखधंदा सुरु झाला (Corona virus Mask Price) आहे.

कोरोनाचा धसका, मास्क घेण्यासाठी धावाधाव, रत्नागिरीत एका मास्कची किंमत...
| Updated on: Mar 04, 2020 | 6:07 PM

रत्नागिरी : जगभरात कोरोना व्हायरसने धुमाकूळ घातला (Corona virus Mask Price)  आहे. कोरोनाच्या विषाणूपासून संरक्षण होण्यासाठी आवश्यक असलेल्या मास्कचा गोरखधंदा सुरु झाला आहे. रत्नागिरीत 170 रुपयांनी विकल्या जाणाऱ्या मास्कची किंमत आता 260 रुपयांवर पोहोचली आहे. तर अनेक मेडिकल शॉपमध्ये N 95 या मास्कचा तुटवडा पाहायला मिळत आहे. त्यामुळे प्रशासनाकडे कोरोना व्हायरसच्या विषाणूपासून वाचण्यासाठी कोणताच प्लॅन दिसत नाही.

कोरोनामुळे जगभरातील लोक त्रस्त झाले (Corona virus Mask Price) आहे. कोरोना कुठल्या देशात कधी आपलं डोकं वर काढेल याचा नेम नाही. त्यामुळेच सध्या भारतात देखील कोरोनाची दहशत पहायला मिळत आहे. कोरोनापासून वाचण्यासाठी राज्यातील प्रशासन आखणी करतं. पण कोरोनाच्या विषाणूपासून वाचण्यासाठी साधा मास्कही बाजारात उपलब्ध नाही. उपलब्ध असलेल्या N 95 मास्कच्या किंमती अव्वाच्या सव्वा आकारल्या जात आहेत.

रत्नागिरी शहरातील मारूती मंदिर परिसरातील मेडिकल शॉपमध्ये N 95 च्या एका मास्कची किंमत 260 सांगण्यात आली. काही दिवसांपूर्वी या मास्कची किंमत 170 रुपये इतकी सांगण्यात येत होती. तर 25 मास्क असलेल्या पाकिटाची किंमत 6 हजार रुपयांच्या घरात सांगण्यात आली आहे. यावर फक्त 10 टक्के डिस्काऊंट मिळेल असं सांगण्यात येत आहे.

Corona Virus | भारतात कोरोनाचा शिरकाव, कोरोना व्हायरस रोखण्यासाठी 10 सोपे उपाय

N 95 या मास्कची विक्री रत्नागिरीत काळ्या बाजाराने होत आहे. ठराविक मेडिकल दुकान वगळता इतर दुकानात मात्र N 95 या मास्कचा तुटवडा आहे. कारण रत्नागिरी शहराला पुरवठा करणाऱ्या मुख्य स्टाँकिस्टच ही मास्क पुरवत नाही. शहरात N 95 मास्कचा तुटवडा असल्याचं मेडिकलमधील दुकानदार सांगतात.

रत्नागिरी शहरातील अनेक मेडिकल दुकानात गेल्यानंतर हे मास्क अद्याप आलेले नाही. याची मागणी केली आहे. मात्र ते येत नाही असं सांगण्यात येत आहे.

तर दुसरीकडे मुंबईतही अनेक ठिकाणी हिरव्या रंगाचा अत्यंत साधा मास्कची किंमत 10 रुपयांवरुन 40 रुपये करण्यात आली आहेत. तर 40 ते 50 रुपयांना मिळणारा पिवळ्या रंगाचा मास्क 100 रुपयांना मिळत आहे. तर N 95 या मास्कची किंमत 150 रुपयांवरुन 200 ते 250 रुपये करण्यात आली आहे.  त्याशिवाय सोलापुरात मास्कची मागणी वाढल्यामुळे याची किंमत दुप्पटीने वाढली आहे.

कोरोनाचा कहर, जगभरात 3,000 हून अधिक जणांचा मृत्यू, भारतालाही कोरोनाचा धोका

कोरोना व्हायरचा धुमाकुळ अजून तरी भारतात मोठ्या प्रमाणात नाही. आजही प्रशासन बैठक घेऊन कोरोना व्हायरसपासून वाचण्यासाठी उपायोजना आखत आहे. मात्र बहुदा ही परिस्थिती पाहिल्यानंतर ती कागदावर असल्याचं पहायला मिळतं आहे. कारण N 95 मास्कचा तुटवडा यावरुन राज्यात हे सरकार यापासून वाचण्यासाठी किती गंभीर आहे याचाच प्रत्यय येतो (Corona virus Mask Price) आहे.