देशात कोरोनाबाधितांची संख्या 1000 च्या पार, 24 तासात 106 कोरोना रुग्ण

भारतात कोरोनाबाधितांची संख्या 1000 च्या वर गेली आहे. तर देशातील मृतांची संख्या ही 26 झाली (Corona Virus India Update) आहे.

देशात कोरोनाबाधितांची संख्या 1000 च्या पार, 24 तासात 106 कोरोना रुग्ण
| Updated on: Mar 29, 2020 | 5:30 PM

नवी दिल्ली : महाराष्ट्रासह देशातही कोरोनाचा कहर पाहायला (Corona Virus India Update) मिळत आहे. दर दिवशी प्रत्येक राज्यात नवे कोरोनाग्रस्त रुग्ण आढळत आहे. त्यामुळे भारतात कोरोनाबाधितांची संख्या 1000 च्या वर गेली आहे. तर देशातील मृतांची संख्या ही 26 झाली आहे.

देशात लॉकडाऊनचा आज पाचवा दिवस आहे. देशभरात (Corona Virus India Update) लॉकडाऊन असल्याने जनतेला अनेक गोष्टींचा सामना करावा लागत आहे. त्यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मन की बात या कार्यक्रमातून देशातील जनतेची माफी मागितली.

देशात आतापर्यंत 1 हजार 037 लोक कोरोनबाधित झाले आहेत. तर आतापर्यत 26 लोकांचा मृत्यू झाला आहे. यात सर्वाधिक रुग्ण हे महाराष्ट्रात आणि केरळमध्ये आढळले आहेत. महाराष्ट्रात आतापर्यंत 193 लोकांना कोरोनाग्रस्त रुग्ण आढळले आहेत.

तर केंद्रीय आरोग्य मंत्रालयाचे सचिव लव अग्रवाल यांनी दिलेल्या माहितीनुसार, देशात आतापर्यत 979 कोरोनाबाधित रुग्ण आढळले आहेत. यात 25 जणांचा मृत्यू झाला आहे. विशेष म्हणजे गेल्या 24 तासात 106 नवे रुग्ण समोर आले आहेत. तर 6 जणांचा मृत्यू झाला आहे.

महाराष्ट्रात कोठे किती रुग्ण?

मुंबई – 77
पुणे – 24
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 25
नागपूर –  12
कल्याण – 7
ठाणे – 5
नवी मुंबई – 6
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
सातारा – 2
कोल्हापूर – 1
गोंदिया – 1
पनवेल – 2
उल्हासनगर – 1
वसई विरार – 4
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1
पुणे ग्रामीण-  1
पालघर- 1
जळगाव- 1
इतर राज्य (गुजरात) – 01

एकूण 193 

Corona Virus India Update