Panvel Corona | पनवेल मनपा विरोधात नगरसेवकाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल

| Updated on: Jun 12, 2020 | 5:07 PM

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, महानगरपालिका प्रशासन योग्य त्या उपाययोजना राबविण्यात अपयशी ठरल्याचे चित्र दिसत (Panvel Corona Patient) आहे.

Panvel Corona | पनवेल मनपा विरोधात नगरसेवकाकडून उच्च न्यायालयात याचिका दाखल
Follow us on

पनवेल : पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाबाधितांची वाढती संख्या लक्षात घेता, महानगरपालिका प्रशासन योग्य त्या उपाययोजना राबविण्यात अपयशी ठरल्याचे चित्र दिसत (Panvel Corona Patient)  आहे. म्हणूनच पनवेलमधील नगरसेवकाने पनवेल महानगरपालिकेविरोधात उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अरविंद म्हात्रे असं या नगरसेवकाचे नाव आहे. म्हात्रे हे शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक (Panvel Corona Patient) आहेत.

पनवेल महानगरपालिका हद्दीत कालपर्यंत (11 जून) एकूण कोरोनाबाधित रुग्णांची संख्या 861 वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासांतही येथे नव्या 44 कोरोनाबाधित रुग्णांची नोंद झाली आहे. मात्र असे असतानादेखील महानगरपालिका प्रशासनाने आतापर्यंत कुठलीही आरोग्य तपासणी केली नाही आहे.

कोरोनाच्या या महाभयंकर काळातही महानगरपालिका प्रशासन मनमानी कारभार करत असल्याचा आरोप महानगरपालिका क्षेत्रातील नावडे प्रभागातील शेतकरी कामगार पक्षाचे नगरसेवक अरविंद म्हात्रे यांनी केला आहे. कोरोना काळात आपण किंवा अन्य लोकप्रतिनिधी यांनी दिलेल्या सूचनांकडे मनपा अधिकारी दुर्लक्ष करत असल्याचा आरोपसुद्धा त्यांनी यावेळी केला.

नगरसेवक म्हात्रे यांच्या नावडे प्रभागात गेल्या काही दिवसांपासून नियमित कोरोनाबाधित आढळत आहेत. यामुळे येथील कोरोनाबाधितांची संख्या सातत्याने वाढली जात आहे.

“कोरोनावर प्रतिबंधात्मक उपाययोजना करणे तर सोडाच, महानगरपालिका प्रशासन मी केलेल्या पत्रव्यवहार आणि इमेलचेही उत्तर देण्यास असमर्थ ठरली” असल्याचेही यावेळी म्हात्रे यांनी सांगितले.

संबंधित बातम्या :

पनवेलचे आयुक्त गणेश देशमुख यांची बदली; सुधाकर देशमुख नवे आयुक्त

तोळ्याने विकणाऱ्यावर किलोने विकण्याची वेळ, लॉकडाऊनमुळे सोनार बनला कांदा व्यापारी