नागपुरात COVID 19 अॅपची निर्मिती, लक्षणं असणाऱ्यांनीच वापरा, तुकाराम मुंढेंच्या सूचना

| Updated on: Mar 27, 2020 | 5:37 PM

नागपूरमध्ये आतापर्यंत 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने COVID- 19 अँपची निर्मिती केली (COVID- 19 App Nagpur) आहे.

नागपुरात COVID 19 अॅपची निर्मिती, लक्षणं असणाऱ्यांनीच वापरा, तुकाराम मुंढेंच्या सूचना
Follow us on

नागपूर : महाराष्ट्रात कोरोनाचा विळखा दिवसेंदिवस वाढत (COVID- 19 App Nagpur) असून राज्यात कोरोनाबाधित रुग्णांचा आकडा तब्बल 147 वर पोहोचला आहे. नागपूरमध्ये आतापर्यंत 9 जणांना कोरोनाची लागण झाली आहे. त्याच पार्श्वभूमीवर नागपूर महानगरपालिकेने COVID- 19 अँपची निर्मिती केली आहे. यात ज्या नागरिकांना ताप, कोरडा खोकला, श्वास घेण्यास त्रास होत असेल, त्यांनी यावर माहिती देण्याचे आवाहन केले आहे.

नागपूरचे पालिका आयुक्त तुकाराम मुंढे यांच्या (COVID- 19 App Nagpur) नेतृत्वात या अॅपची निर्मिती करण्यात आली. https://drive.google.com/file/d/1abB97jEnkrzvIzcOY0eebr_wcQ8tT_sJ/view?usp=drivesdk ही या अॅपची लिंक आहे.

यावेळी ज्या नागरिकांना ताप, कोरडा खोकला व श्वास घेण्यास त्रास होत असेल त्यांनी खालील दिलेल्या लिंक वर क्लिक करुन सदर अँप डाऊनलोड करावा, असे आवाहन तुकाराम मुंढेंनी केले आहे.

हे अॅप डाऊनलोड केल्यानंतर त्यात नागरिकांनी स्वत: च्या आजाराविषयी माहिती भरावी. त्यानंतर सबमिट बटणावर क्लिक करावे. या माहितीच्या आधारे कोविड-19 ची लक्षणे असल्यास मनपाच्या डॉक्टरांना कळेल. त्यानंतर मनपाचे डॉक्टर आपल्याशी संपर्क करुन पुढील कार्यवाही करतील.

हे अॅप फक्त कोविड-19 चे लक्षणे जसे ताप, कोरडा खोकला आणि श्वास घेण्यास त्रास असणाऱ्या नागरिकांसाठी आहे. इतरांनी या अॅपचा वापर करु नये असा इशाराही देण्यात आला आहे.

महाराष्ट्रात कुठे किती कोरोनाबाधित रुग्ण?

कोरोनाचे कुठे किती रुग्ण?

मुंबई – 51
पुणे – 20
पिंपरी चिंचवड – 12
सांगली – 23
नागपूर – 9
कल्याण – 5
ठाणे – 5
नवी मुंबई – 5
यवतमाळ – 4
अहमदनगर – 3
सातारा – 2
कोल्हापूर – 1
गोंदिया – 1
पनवेल – 1
उल्हासनगर – 1
वसई विरार – 1
औरंगाबाद – 1
सिंधुदुर्ग – 1
रत्नागिरी – 1

एकूण 147

संबंधित बातम्या : 

Corona | पुढील तीन महिने EMI ला स्थगिती द्या, RBI च्या सल्ल्याचे तुमच्यावर काय परिणाम?

नाकं मुरडणाऱ्या डॉक्टरांना आरोग्यमंत्र्यांचा डोस, भीतीपोटी काम न थांबवण्याचा सल्ला

अजित पवारांना एक फोन आणि युवासेना पदाधिकाऱ्याचं काम फत्ते