कै. विश्वासघातकी, शोकाकुल आत्मक्लेश! मुलगी पळून गेल्याने बापाने गावभर फलक लावले!

| Updated on: Feb 14, 2020 | 12:20 PM

मुलगी घरातून पळून गेल्याने संतापलेल्या बापाने चक्क तिचे फलकच (Kolhapur daughters hording ) गावभर लावले. कागल तालुक्यातील  व्हन्नूर या गावातील ही घटना आहे.

कै. विश्वासघातकी, शोकाकुल आत्मक्लेश! मुलगी पळून गेल्याने बापाने गावभर फलक लावले!
Follow us on

कोल्हापूर : मुलगी घरातून पळून गेल्याने संतापलेल्या बापाने चक्क तिचे फलकच (Kolhapur daughters hoarding ) गावभर लावले. कागल तालुक्यातील  व्हन्नूर या गावातील ही घटना आहे. या पोस्टवर मुलीचा उल्लेख कै. विश्वासघातकी असा केला आहे. सोबतच आपली उद्विग्नता दाखवणारा एक संदेशही या डिजीटल फलकावर लिहिण्यात आला आहे.(Kolhapur daughters hoarding )

शिवाय असं वागणाऱ्या मुलींनी आई-वडिलांना होणाऱ्या वेदनांची जाणीव व्हावी यातून त्यांनी धडा घ्यावा असा संदेश देखील या बापाने दिला आहे. दरम्यान रात्री हे पोस्टर लागताच पोलीस पाटलांच्या सूचनेनुसार डिजीटल फलक तात्काळ उतरुन घेण्यात आले. मात्र हे हे पोस्टर सोशल मीडियात व्हायरल होत असल्याने  जिल्हाभर उलटसुलट चर्चा सुरु आहेत.

असा आहे संदेश 

शोकाकुल आत्मक्लेश

बाळ तू जन्माला येतानाच संधिवाताचा आजार तुझ्या आईला घेऊन आलीस. त्या वेदना सहन करत ज्या आईने तुझे सर्व हट्ट, लाड पुरवीत मोठे केले ती दुर्देवी आई…

आज अखेर तुला तळहाताच्या फोडाप्रमाणे जपलेला परंतु या पुढच्या तुझ्या आयुष्यात आनंद,सुख देण्यास असमर्थ ठरला म्हणून तू सोडून गेलीस. हा काळा दिवस पाहण्यासाठी जिवंत असलेला असा हा कम नशिबी बाप.