रणवीर-दीपिका विवाहबंधनात, इटलीत शाही सोहळा संपन्न

इटली : बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंग अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. इटलीमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी कोकणी पद्घतीने लग्न केलं. भारतीय वेळेनुसार 2 वाजता सुरु झालेला लग्न सोहळा दुपारी 4.45 वाजता संपन्न झाला. या सोहळ्याला केवळ 30 नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींचा समावेश होता. मुंबईत ग्रँड रिसेप्शन मुंबईत 15 नोव्हेंबरला दीपिका-रणवीरचा […]

रणवीर-दीपिका विवाहबंधनात, इटलीत शाही सोहळा संपन्न
| Edited By: | Updated on: Jul 05, 2019 | 5:02 PM

इटली : बॉलिवूडमधील बहुचर्चित जोडी अभिनेत्री दीपिका पादुकोन आणि अभिनेता रणवीर सिंग अखेर लग्नाच्या बेडीत अडकले आहेत. इटलीमध्ये दीपिका आणि रणवीर यांनी कोकणी पद्घतीने लग्न केलं. भारतीय वेळेनुसार 2 वाजता सुरु झालेला लग्न सोहळा दुपारी 4.45 वाजता संपन्न झाला. या सोहळ्याला केवळ 30 नातेवाईक आणि मित्र-मैत्रिणींचा समावेश होता.

मुंबईत ग्रँड रिसेप्शन

मुंबईत 15 नोव्हेंबरला दीपिका-रणवीरचा सिंधी पद्घतीने लग्न होणार आहे. तर बंगळुरु येथे 28 नोव्हेंबर रोजी ग्रँड रिसेप्शन आयोजित केलं आहे. या रिसेप्शनला विविध क्षेत्रातील नामवंत उपस्थित राहणार असल्याची माहिती मिळते आहे.

मोठ्या फौजफाट्यात लग्न

दीपिका आणि रणवीरचे मोठ्या फौजफाट्यात लग्न झालं. यावेळी पाण्यातही सुरक्षा रक्षक तैनात करण्यात आले होते. त्यामुळे लग्न ठिकाणाला छावणीचं स्वरुप आले होते.

8 हजार फुलं

आर्यलंडवर डेकोरेशनसाठी 8 हजार पांढऱ्या रंगांच्या फुलांचा वापर करण्यात आला होता. विशेष म्हणजे, मुंबईत होणाऱ्या रिसेप्शनमध्ये लाल रंगाच्या फुलांचा वापर केला जाणार आहे.

दरम्यान, दीपिका आणि रणवीर यांचं लग्न झाल्याने सोशल मीडियावरुन दोघांवर शुभेच्छांचा वर्षाव सुरू आहे.