धनगर आरक्षणाबाबत चेष्टा थांबवा, अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही, मल्हार आर्मी संघटनेचा इशारा

| Updated on: Sep 22, 2020 | 4:39 PM

जर धनगर समाज एकवटला, तर रस्त्यावर फिरु देणार नाही," असा इशारा मल्हार आर्मी संघटनेनं सरकारला दिला आहे. (Dhangar community reservation issue) 

धनगर आरक्षणाबाबत चेष्टा थांबवा, अन्यथा रस्त्यावर फिरु देणार नाही, मल्हार आर्मी संघटनेचा इशारा
Follow us on

मुंबई : “धनगर समाजाची आरक्षणाबाबत चेष्टा थांबवा, जर जिल्ह्या-जिल्ह्यातील धनगर समाज एकवटला, तर रस्त्यावर फिरु देणार नाही,” असा इशारा मल्हार आर्मी संघटनेनं सरकारला दिला आहे. “धनगर समाजाने आरक्षणाच्या मागणीसाठी आंदोलन सुरु केले आहे. तुळजाभवानी देवीच्या आशीर्वादाने सुरु केलेल्या या आंदोलनात आता माघार घेता येणार नाही,” अशी प्रतिक्रिया मल्हार आर्मीचे प्रमुख भाऊ कांबळे यांनी दिली. (Dhangar community reservation issue)

“धनगर आरक्षणाबाबत सरकारने समाजाची चेष्टा थांबवा. धनगर आंदोलनाची मशाल वेगवेगळ्या जिल्हयात फिरवणार आहे. जर जिल्ह्या-जिल्ह्यातील धनगर एकवटला तर रस्त्यावर फिरु देणार नाही. आंदोलन हे काय असतं ते आम्ही दाखवून देऊ,” असे भाऊ कांबळे म्हणाले.

“धनगर समाजाने तुळजाभवानीच्या आशीर्वादाने हे आंदोलन सुरु केले आहे. त्यामुळे यात आता माघार घेणार नाही,” असे मल्हार आर्मीचे प्रमुख भाऊ कांबळे यांनी सांगितले.

दरम्यान धनगर समाज आरक्षणाच्या मुद्द्याला घेऊन आता चांगलाच आक्रमक झाला आहे. धनगर समाजाला तात्काळ आरक्षणात सामावून घ्यावं या मागणीसाठी तुळजाभवानी चरणी गोंधळ घालत आरक्षणाची मशाल पेटवण्यात आली. मल्हार सेनेच्या वतीने तुळजापूर येथे तुळजाभवानीच्या महाद्वारसमोर संबळ वाजवून आरक्षणाची ज्योत पेटवली.

धनगर समाजाला घटनेत आरक्षण दिले आहे, ते आरक्षण मिळावे यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे. जर राज्य सरकारने या आंदोलनाची दखल घेतली नाही तर राज्य सरकारच्या मंत्र्यांच्या गाड्या अडविण्याचा इशारा देण्यात आला आहे. तुळजाभवानी मातेचे मंदिरासमोर पेटवण्यात आलेली मशाल राज्यभर फिरवणार आहे. जोपर्यंत आरक्षण मिळत नाही तोपर्यंत ही मशाल पेटत राहणार आहे, असेही मल्हार सेनेनं सांगितले. (Dhangar community reservation issue)

संबंधित बातम्या : 

राज्यातील जिम, रेस्टॉरंट सुरू करा; रोहित पवार यांची मागणी

कृषीविधेयक तात्काळ रद्द करा; शरद पवार यांची मागणी